Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

Marathi Breaking Live Updates : राजकारण, समाजकारण, अर्थविश्व, क्रीडा, मनोरंजनसह देश-विदेशातील इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 22, 2026 | 12:20 PM
LIVE
Top Marathi News Today Live : महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

Top Marathi News Today Live : महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

Follow Us
Close
Follow Us:
  • 22 Jan 2026 12:25 PM (IST)

    22 Jan 2026 12:25 PM (IST)

    सलग तीन पराभवानंतर गुजरातला कमबॅक करण्याची संधी

    WPL 2026 च्या या स्पर्धेत युपी वॉरियर्सचा फॉर्ममध्ये नसलेल्या गुजरात जायंट्सविरुद्ध वरचढ ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, उर्वरित दोन प्लेऑफ स्थानांसाठीची स्पर्धा अत्यंत रोमांचक बनली आहे.

  • 22 Jan 2026 12:20 PM (IST)

    22 Jan 2026 12:20 PM (IST)

    हैदराबादमध्ये 28 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत संपवलं

    हैदराबादमध्ये नाश्ता करताना प्लेटवर हात धुतल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन मित्रांत वाद झाला. वादाचे मारहाणीत रूपांतर होऊन अतुल सहानीच्या हल्ल्यात 28 वर्षीय श्याम पांचाळचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला..

  • 22 Jan 2026 12:15 PM (IST)

    22 Jan 2026 12:15 PM (IST)

    जगात पहिल्यांदा पास्त्याचा शोध कधी आणि कोणी लावला?

    आवडीने खाल्लेल्या पास्त्याची कथा प्राचीन इटली, अरब जग आणि भूमध्यसागरीय व्यापार मार्गांपर्यंत पसरलेली आहे. पास्ताला आधुनिक स्वरूप देणारा देश म्हणून इटली ओळखला जातो.इटलीमध्ये रोजच्या आहारात प्रामुख्याने पास्त्याचे सेवन केले जाते. त्यांच्या आहारात पास्ता, नूडस्ल्स इत्यादी पदार्थ प्रामुख्याने असतात. पाचव्या शतकाच्या आसपास अरब लोक वाळलेला, सुकलेला पास्ता बनवून खायचे.

  • 22 Jan 2026 12:10 PM (IST)

    22 Jan 2026 12:10 PM (IST)

    “तुझ्याशिवाय जगू शकत नाही…” प्रेमविरोधामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

    अकोल्यात प्रेमविरोधामुळे निराश झालेल्या तरुणाने इंस्टाग्रामवर भावनिक रील शेअर करत विषप्राशनाचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल होताच सायबर सेल व पोलिसांनी 20 मिनिटांत शोध घेऊन रुग्णालयात दाखल केल्याने तरुणाचे प्राण वाचले

  • 22 Jan 2026 12:05 PM (IST)

    22 Jan 2026 12:05 PM (IST)

    मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात

    राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होऊन निकाल आता हाती आले आहेत. या निवडणुकीच्या तयारीसाठी अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक जबाबदारी अर्थात इलेक्शन ड्युटी दिली गेली होती. मात्र, यातील काही कर्मचाऱ्यांनी इलेक्शन ड्युटीला दांडी मारली. महापालिका निवडणुकीत ज्या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि निवडणूक कर्तव्यावर गैरहजर राहिले, त्यांच्यावर प्रशासन आता कडक पावले उचलत आहे.

  • 22 Jan 2026 11:55 AM (IST)

    22 Jan 2026 11:55 AM (IST)

    १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणातील सज्जन कुमारची निर्दोष मुक्तता

    १९८४ च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने जनकपुरी आणि विकासपुरीमध्ये जमावाला हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश दिग्विजय सिंह यांनी २२ जानेवारीपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित एका प्रकरणातून सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे न्यायालयाने कळवले तेव्हा सज्जन कुमार यांनी हात जोडून न्यायालयाचे आभार मानले.

  • 22 Jan 2026 11:45 AM (IST)

    22 Jan 2026 11:45 AM (IST)

    औरंगजेबाने काशी विश्वनाथ कॉरिडॉर पाडला - अमित शाह

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. ऋषिकेश येथील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभेला संबोधित केले. जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी मुघल राजवटीत हिंदू धार्मिक स्थळांवर झालेल्या अत्याचारांचा उल्लेख करत म्हटले की, "गझनवी, खिलजी, मोहम्मद बेगडा, ज्यांनी त्यांना उद्ध्वस्त केले ते सर्व गायब झाले आहेत. सोमनाथ येथे सनातनचा झेंडा आजही फडकत आहे."

  • 22 Jan 2026 11:35 AM (IST)

    22 Jan 2026 11:35 AM (IST)

    नगरसेविका सरिता मस्के यांचा पत्ता लागला, चर्चांना पूर्णविराम

    शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता मस्के या नॉट रिचेबल होत्या त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडुन महायुतीमध्ये प्रवेश केला असल्याचे बोलले जात होते. मात्र नगरसेविका सरिता मस्के या ठाकरे गटाचे नेते आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी पोहचल्या आहेत. त्यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

  • 22 Jan 2026 11:25 AM (IST)

    22 Jan 2026 11:25 AM (IST)

    ED ने कारवाई केलेल्या I-PAC कंपनीच्या फडिंगमध्ये घोळ

    पश्चिम बंगालच्या राजकारणात वादळ निर्माण करणारी संघटना आय-पीएसी (इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी) एका नवीन वादात अडकली आहे. आय-पीएसीने २०२१ मध्ये हरियाणातील रोहतक येथील एका कंपनीकडून १३.५० कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज घेतल्याचा दावा केला आहे, परंतु सरकारी नोंदींमध्ये त्या नावाची कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.

  • 22 Jan 2026 11:15 AM (IST)

    22 Jan 2026 11:15 AM (IST)

    प्रजासत्ताक दिनी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

    77 वा प्रजासत्ताक दिन अवघ्या चार दिवसांवर आहे. जोरदार तयारी केली जात आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची खास तयारी सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांची फोटो असलेले पोस्टर जारी केले आहे. या पोस्टमध्ये पहिल्यांदाच दिल्लीतील एका दहशतवाद्याचा फोटो आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू असली तरीही सुरक्षा यंत्रणांचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे.

  • 22 Jan 2026 11:05 AM (IST)

    22 Jan 2026 11:05 AM (IST)

    दासबोधातून नीतिमत्तेची शिकवण देणारे समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथी

    महाराष्ट्रामधील संतपरंपरेतील एक महान संत आणि ग्रंथकार समर्थ रामदास स्वामी यांची आज पुण्यतिथी. आजच्या दिवशी 1682 त्यांनी सज्जनगडावर देह ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रात रामदासी पंथाची स्थापना केली. ‘दासबोध’, ‘मनोबोध’ यांसारख्या ग्रंथांतून लोकांना कर्तव्य, नीतिमत्ता व भक्तीचा उपदेश केला. त्यांनी रामभक्तीचा प्रसार केला, हनुमानाची मंदिरे स्थापन केली आणि त्यांचे कार्य आजही “जय जय रघुवीर समर्थ” या घोषवाक्याने स्मरणात ठेवले जाते.

  • 22 Jan 2026 10:52 AM (IST)

    22 Jan 2026 10:52 AM (IST)

    अमेरिकेच्या ‘गोल्डन डोम’वरुन कॅनडाला मोठा इशारा

    स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वार्षिक जागतिक आर्थिक शिखर परिषद सध्या सुरु आहे. २३ जानेवारी २०२६ पर्यंत ही परिषद असणार आहे. दरम्यान या परिषेदत अमेरिका (America) आणि कॅनडात (Canada) मोठा वाद निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जागतिक व्यवस्थेवरुन केलेल्या टीकेनंतर अमेरिका आणि कॅनडातील तणाव पुन्हा स्पष्ट झाल आहे. ट्रम्प यांनी मार्क कार्नी यांच्या व्यक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच कॅनडाच्या सुरक्षेवरुन मोठे वादग्रस्त विधान केले आहे.

  • 22 Jan 2026 10:45 AM (IST)

    22 Jan 2026 10:45 AM (IST)

    युरोपची मोठी कबुली! प्रजासत्ताक दिनापूर्वी आनंदाची बातमी

    भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जागतिक राजकारणातून एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. युरोपियन युनियनच्या (EU) परराष्ट्र धोरण प्रमुख कोया कॅलास (Kaja Kallas) यांनी युरोपियन संसदेत बोलताना भारताचे वर्णन युरोपसाठी “अपरिहार्य” (Indispensable) असे केले आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून येण्यापूर्वी ईयू नेत्यांनी भारतासोबतच्या तीन महाकरारांना हिरवा कंदील दिला आहे, ज्यामुळे येणारा काळ भारताच्या आर्थिक आणि सामरिक प्रगतीसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे.

  • 22 Jan 2026 10:37 AM (IST)

    22 Jan 2026 10:37 AM (IST)

    ‘ओ रोमियो’मधील Shahid Kapoor पासून नाना पाटेकरांपर्यंत फीची चर्चा

    २०२६ मध्ये शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा आणखी एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. ‘ओ’ रोमियो’ सोबत चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज आणि अभिनेता शाहिद कपूर यांची समीक्षकांनी प्रशंसा केलेली जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाली आहे. शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांचा हा चौथा चित्रपट आहे, जो खऱ्या घटनांवर आधारित एक रोमांचक प्रेमकथा आहे.ज्यामध्ये शाहिद कपूरने त्याच्या भयंकर शैलीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

  • 22 Jan 2026 10:30 AM (IST)

    22 Jan 2026 10:30 AM (IST)

    अमेरिकेतील रशियन निधीतून होणार युक्रेनची पुनर्बांधणी

    गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी (२२ जानेवारी) एक ऐतिहासिक घोषणा केली, ज्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी प्रस्तावित केलेल्या ‘शांतता मंडळा’ (Board of Peace) मध्ये सामील होण्यासाठी आणि गाझासह युक्रेनमधील शांतता प्रक्रियेसाठी रशिया आपला गोठवलेला निधी देण्यास तयार असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.

  • 22 Jan 2026 10:21 AM (IST)

    22 Jan 2026 10:21 AM (IST)

    बांग्लादेशची T20 World Cup 2026 ची मागणी ICC ने फेटाळली!

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवार, २१ जानेवारी रोजी स्पष्ट केले की २०२६ च्या पुरुषांच्या T20 विश्वचषक वेळापत्रकात शेवटच्या क्षणी कोणताही बदल होणार नाही. बांगलादेशला आता T20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जावे लागेल किंवा स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. बांगलादेशकडे फक्त आज, २२ जानेवारीपर्यंतच वेळ आहे. परिणामी, बांगलादेशच्या क्रीडा सल्लागाराने संघ भारतात जाईल की नाही हे ठरवण्यासाठी खेळाडूंसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 22 Jan 2026 10:15 AM (IST)

    22 Jan 2026 10:15 AM (IST)

    देशासोबतच्या मैत्रीमुळे भारतासाठी सुरु होणार सुवर्णकाळ

    एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि नामीबियाचे संबंध आता केवळ राजकीय मैत्रीपुरते मर्यादित राहणार नसून बहुआयामी भागीदारीचे स्वरुप घेत आहेत. दोन्ही देशांतील मैत्री आणि विश्वासामुळे हे संबंध अधिक दृढ होणार आहेत. आता भारत आणि नामीबियाचे संबंध जागतिक सहकार्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दोन्ही देश  उर्जा, खनिज, आणि आर्थिक सहकार्य  वाढवण्यावर भर देणार आहेत.

  • 22 Jan 2026 10:05 AM (IST)

    22 Jan 2026 10:05 AM (IST)

    अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्षभरात ७४ लाख ज्येष्ठांनी केला प्रवास

    अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पुणे एसटी विभागातून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात ७३ लाख ७२ हजार ३६७ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतलेला आहे.ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्या अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यांचा लाभ मिळतो.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) या योजनेसाठी ५८५ रुपये भरून एक स्मार्ट कार्ड घ्यावे लागते, ज्यामुळे वर्षभर प्रवास मोफत करता येतो.

  • 22 Jan 2026 09:55 AM (IST)

    22 Jan 2026 09:55 AM (IST)

    जयकुमार गोरेंच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत प्रवेश

    वाई तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या एका घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जयकुमार गोरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे युवा नेते विराज शिंदे, माजी पंचायत समिती सदस्या रुतुजा शिंदे यांच्यासह बावधन व शेंदुरजणे गणातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

  • 22 Jan 2026 09:45 AM (IST)

    22 Jan 2026 09:45 AM (IST)

    प्रेमसंबंध व पैशांच्या वादातून लॉजमध्ये 51 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य

    छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातील तणाव आणि पैशांच्या वादातून एका 51 वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (२० जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वेरूळ (ता. खुलताबाद) येथील हॉटेल शिवसेवा रेसिडेन्सी लॉजिंग अँड रेस्टॉरंट येथे घडली.

  • 22 Jan 2026 09:35 AM (IST)

    22 Jan 2026 09:35 AM (IST)

    ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं

    स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos) येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum) वार्षिक शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धाच्या (Trade War) चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले. “मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे, ते माझे मित्र आहेत आणि आम्ही लवकरच एक मोठा व्यापार करार करणार आहोत,” असे विधान ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

  • 22 Jan 2026 09:25 AM (IST)

    22 Jan 2026 09:25 AM (IST)

    सांगली जिल्हा बँकेवर दरोडा टाकणारे दरोडेखोर अखेर सापडले

    झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा बँकेतील चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. सव्वा तीन कोटींच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सांगली गुन्हे अन्वेषण विभागाने ही कामगिरी केली.

  • 22 Jan 2026 09:15 AM (IST)

    22 Jan 2026 09:15 AM (IST)

    ऐन जानेवारी महिन्यात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

    गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील हवामान बदलत आहे. तीव्र थंडीचा कालावधी आणि नंतर दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यानंतर आता पावसाळा जवळ येत आहे. गुरुवारपासून पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्याचे परिणाम नंतर पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेशात पसरतील. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Marathi Breaking News Updates : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. याचे निकालही हाती आले आहेत. त्यानंतर आता महापौरपदासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच आता मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज (दि.२२) आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

१६ जानेवारी रोजी २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर सत्ता स्थापनेचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे महापौरपदाचे आरक्षण निश्चित होणे. मात्र, आरक्षणाची सोडत न निघाल्याने संबंधित महापालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया रखडली होती. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत पार पडणार आहे. सोडतीनंतर संबंधित महापालिका आयुक्त महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news live updates international news national news crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Marathi News Live Updates
  • navarashtra breking news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.