Maharashtra Breaking News
17 Oct 2025 11:40 AM (IST)
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ब्राझीलचे उपाध्यक्ष आणि विकास, उद्योग, व्यापार आणि सेवा मंत्री गेराल्डो अल्कमिन यांची भेट घेतली. यावेळी देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर चर्चा झाली.
17 Oct 2025 11:30 AM (IST)
लखनौमध्ये युरिया आणि डिटर्जंटपासून बनवलेला ८०२ किलो खवा जप्त करण्यात आला. हे रॅकेट राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरू होते. दिवाळीच्या सणापूर्वी हे सापडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
लखनऊ में यूरिया और डिटर्जेंट से तैयार 802 किलो खोआ पकड़ा गया है
पूरे प्रदेश में गोरखधंधा चल रहा है आपकी जान से खिलवाड़ हो रहा है
अपने रिस्क पर ही बाहर का कुछ खाइए
pic.twitter.com/V8A9nRvyz0— Surya Samajwadi (@surya_samajwadi) October 16, 2025
17 Oct 2025 11:15 AM (IST)
“कोणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही. विमानतळ झाला पाहिजे हे सगळ्याचं म्हणणं असेल, तर ज्या जागेवर होणार त्या भागातल्या शेतकऱ्याला, जमीन मलाकाला उद्धवस्त करुन चालणार नाही. योग्य नुकसानभरपाई, पर्यायी जमीन द्यावी ही त्यांची मागणी आहे. मी त्यांना सांगितलय की, यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना विनंती करणार आहे. असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन” असं शरद पवार म्हणाले.
17 Oct 2025 11:02 AM (IST)
चित्रपटसृष्टीतील एक शुक्रतारा म्हणून अभिनेत्री स्मिता पाटीलला ओळखले जाते. तिने जगाचा निरोप घेतला असला तरी आजही ती प्रेक्षकांच्या मनामध्ये जीवंत आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून आपल्या अभियनाची छाप सोडणाऱ्या स्मिताने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या प्रभावी आवाज, देखणं व्यक्तीमत्व आणि अभिनय कौशल्य यामुळे अल्पावधीच स्मिताने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 17 ऑक्टोबर 1955 रोजी तिचा जन्म झाला. तिने पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेमध्ये शिक्षण घेतले. १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले.
17 Oct 2025 10:53 AM (IST)
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
17 Oct 2025 10:44 AM (IST)
रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम सुरु झाला आहे, यामध्ये अनेक भारतीय आंतराष्ट्रीय संघामध्ये खेळणारे खेळाडू हे कमाल करताना दिसत आहेत. रणजी ट्रॉफीचे दोन दिवस सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामात रणजी ट्रॉफीचा उत्साह वाढला आहे. तरुण खेळाडू वरिष्ठांमध्ये आपली छाप पाडत आहेत. पहिला फेरी १५ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. पहिल्या दिवशी सात शतके झळकावली गेली, तर दुसऱ्या दिवशी सहा शतके झळकावली गेली. पाच द्विशतकेही नोंदली गेली.
17 Oct 2025 10:36 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये धमाका सेल लाईव्ह झाला आहे. या सलदरम्यान फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना प्रिन्सेस डार्कहार्ट बंडल आणि प्रिन्स डार्कहार्ट बॅकपॅक सारखे गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. फ्री फायर मॅक्स हा भारतातील पॉपुलर बॅटल रॉयल गेम आहे. या पॉपुलर बॅटल रॉयल गेममध्ये प्लेअर्सना वेगवेगळे इन-गेम आइटम्स मिळवण्याची संधी असते. हे गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी Diamonds खर्च करावे लागतात. हे डायमंड मिळवण्यासाठी प्लेअर्सना पैसे खर्च करावे लागतात. जर तुम्हाला गेममध्ये वस्तू खरेदी करताना Diamonds वाचवायचे असतील, तर गेममधील नवीनतम ईव्हेंट तुमच्यासाठी लाईव्ह आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स आकर्षक गेमिंग आयटम्स जिंकू शकतात.
17 Oct 2025 10:29 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी महत्त्वाचीच नव्हे तर प्रतिष्ठेचीही मानली जात आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून बिहारच मुख्यमंत्री कोण होणार,याबाबतही चर्चांना जोर आला आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. राजधानी पटना येथील एका मीडिया चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना, एनडीएच्या विजयानंतर विधीमंडळ पक्ष बिहाराच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.
17 Oct 2025 10:21 AM (IST)
इस्रायल-हमास युद्धाच्या समाप्तीनंतर आणि शांतता करारानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील कोणताही वाद सोडवण्याचा एक नवा आत्मविश्वास मिळाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनाही डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या आणि पुतिन यांच्यातील वाद सोडवतील अशी मोठी आशा आहे. म्हणूनच यावेळी वॉशिंग्टनमध्ये पोहोचलेल्या झेलेन्स्की यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. ते रशियन राष्ट्राध्यक्षांची तुलना अतिरेकी संघटना हमासशी करत आहेत. रशिया आणि युक्रेन युद्ध अनेक वर्षांपासून चालू आहे.
17 Oct 2025 10:13 AM (IST)
जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक. १० लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालिकेच्या बांधकामाचे बिल अदा करण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडून लाच स्वीकारत असतांना एसीबीने कारवाई केली. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्यांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी झडती घेत आहेत. या कारवाईने सर्वांचे लक्ष लागले आहे.
17 Oct 2025 10:06 AM (IST)
भारताच्या संघाने आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले तर इतर संघाना एक वेळा पराभुत करुन एकही सामना न गमावता आशिया कप जिंकला आहे. पण त्यानंतर आशिया कप 2025 च्या ट्राॅफीवरुन मोठा वाद पाहायला मिळाला. अजूनपर्यत भारताच्या संघाला आशिया कप 2025 ट्राॅफी देण्यात आलेली नाही. टीम इंडियाने २०२५ चा आशिया कप ट्रॉफी जिंकला नसेल, पण या स्पर्धेचे आयोजन केल्याने बीसीसीआयला १०० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
17 Oct 2025 10:00 AM (IST)
भारतात 17 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,943 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,864 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,707 रुपये आहे. भारतात 17 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,29,430 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,070 रुपये आहे. भारतात आज 17 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 188.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,88,900 रुपये आहे.
17 Oct 2025 09:55 AM (IST)
ऋषभ शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला “कांतारा चॅप्टर १” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपवादात्मकरित्या चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि या काळात, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे, शिवाय तो प्रचंड कमाईही करताना दिसत आहे. २०२२ च्या ब्लॉकबस्टर “कांतारा” च्या प्रीक्वलने पुन्हा एकदा भारतात आणि परदेशात नवे विक्रम मोडले आहेत. “कांतारा चॅप्टर १” ने रिलीजच्या १५ व्या दिवशी, तिसऱ्या गुरुवारी किती कमाई केली जाणून घेऊयात.
17 Oct 2025 09:50 AM (IST)
Pune Police News: शहर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि वाहतूक विभागात अनेक अधिकारी बदलले गेले आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बदल्यांमध्ये ६ गुन्हे शाखेचे निरीक्षक समाविष्ट आहेत. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बदली अनुक्रमे कंट्रोल आणि वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.
17 Oct 2025 09:45 AM (IST)
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे तर दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. 19 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेम्बा बावुमा याचा भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका अ संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बावुमाचा दक्षिण आफ्रिका अ संघात समावेश करण्यात आला नव्हता.
17 Oct 2025 09:37 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हत्येची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर धारदार शास्त्राने वार करत हत्या करण्यात आल्या आहे. शुभम रणवीर सिंह राजपुत असे मृत तरुणाचे नाव आहे. गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हटकल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपीने पोरं गोळा करत तरुणाला धारधार शास्त्राने हल्ला करत संपवले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. ही घटना संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नागद गावात मंगळवारी रात्री सडे आठच्या सुमारास घडली आहे.
17 Oct 2025 09:33 AM (IST)
काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशचा पराभव केला. त्यांनी मालिका ३-० अशी जिंकली. टी20 मालिकेमध्ये अफगाणिस्तानचा पराभव झाल्यानंतर त्यांनी एकदिवसीय मालिकेमध्ये तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिका एकतर्फी जिंकली आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजी देखील दमदार राहिली. बांग्लादेशच्या फलंदाजांची कामगिरी एकदिवसीय मालिकेमध्ये फारच निराशाजनक राहिली आहे. मेहदी हसनच्या नेतृत्वाखाली संघाला दारुण पराभव पत्करावा लागला.
17 Oct 2025 09:27 AM (IST)
वर्धा : आते बहिणीसह तिच्या पतीने नोकरीचे आमिष दाखवून मामेभावासह त्याच्या मित्राला तब्बल 12 लाखांना गंडा घातला. ही घटना बुधवारी (दि.१५) तक्रारीनंतर उघडकीस आली. याप्रकरणी अभिषेक राजेश ब्राह्मणे (रा. महत्मा फुले वॉर्ड) यांच्या तक्रारीवरून अभिषेकची आतेबहीण प्रियंका रामचंद्र पाटील व रामचंद्र पाटील (दोन्ही रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश) या दाम्पत्याविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 Oct 2025 09:20 AM (IST)
नवी दिल्ली : भारत देशात अनेक लढाऊ विमाने, शक्तिशाली क्षेपणास्त्रांचा समावेश होत आहे. त्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर, हवाई दल ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने निर्मित तेजस मार्क-१ए लढाऊ विमान आज नाशिकमध्ये पहिले उड्डाण करणार आहे. या पहिल्या उड्डाणानंतर, हवाई दलाला लवकरच दोन नवीन विमाने मिळणार आहेत.
17 Oct 2025 09:15 AM (IST)
भारतीय क्रिकेट सुपरस्टार विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून असा अंदाज वर्तवला जात आहे की हा दौरा विराट आणि रोहित शर्मा यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा असू शकतो.
अलीकडेच विराटने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता, तेव्हा तुम्ही खरोखरच अपयशी ठरता.” या पोस्टनंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा एकदा चांगलीच चालना मिळाली. सध्या विराटने कसोटी आणि टी-२० स्वरूपातून निवृत्ती घेतली असून तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याचा एकदिवसीय प्रवास किती काळ टिकणार, तसेच तो २०२७ च्या विश्वचषकात टीम इंडियाचा भाग असेल का, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.
17 Oct 2025 09:05 AM (IST)
देशातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या नेस्लेमध्ये नोकऱ्या कपातीची बातमी समोर आली आहे. कंपनी १६,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे, जे तिच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या अंदाजे ६ टक्के आहे. हे पाऊल नेस्लेचे नवे सीईओ फिलिप नवरातिल यांनी उचलले आहे, जे फार काळ कंपनीत नाहीत. त्यांच्या निवेदनात, सीईओंनी म्हटले आहे की जग वेगाने बदलत आहे आणि नेस्लेला त्याच वेगाने जुळवून घ्यावे लागेल. कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे यासारखी कोणतीही कठीण आणि आवश्यक पावले उचलण्यास ते तयार आहेत.
17 Oct 2025 08:50 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आता चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. दरम्यान, अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. पाटणा येथील एका मीडिया चॅनेलच्या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, एनडीएच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार विधिमंडळ पक्षाकडूनच ठरवला जाईल.
17 Oct 2025 08:41 AM (IST)
बॉलिवूडमधील बहुमुखी अभिनेता मनोज बाजपेयी यांचा एका राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी बनवलेला कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये आश्चर्याची लाट पसरली आहे.तथापि, या प्रकरणावर स्वतः मनोज बाजपेयी यांनी प्रतिक्रिया देत व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. “हा माझा खरा व्हिडिओ नाही. काहीजणांनी माझ्या जुन्या ओटीटी जाहिरातीचा वापर करून ती राजकीय संदेशासारखी दिसावी, अशा प्रकारे एडिट केली आहे,” असे त्यांनी सांगितले. बनावट व्हिडिओ तयार करून दिशाभूल करणाऱ्या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केला असून, अशा प्रकारच्या कृतींविरुद्ध योग्य कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
17 Oct 2025 08:40 AM (IST)
जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज १७ ऑक्टोबर रोजी, शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,६१३ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४३ अंकांनी कमी होता.
17 Oct 2025 08:36 AM (IST)
अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला परिसरातील ‘HOPS Kitchen & Bar’ (All Spice Kitchen & Bar) येथे अल्पवयीन मुलींना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेनंतर दोन मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १६ वर्षांची आणि २१ वर्षांची दोन मुली या बारमध्ये गेल्या होत्या. बारमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे वय किंवा ओळखपत्र तपासल्याशिवाय त्यांना व्होडका दिल्याचा आरोप आहे. काही वेळातच दोघींची तब्येत बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
17 Oct 2025 08:34 AM (IST)
कुख्यात गुंड निलेश घायवळ याने ताबा मारलेल्या कोथरूड परिसरातील एका अपार्टमेंटमधील 10 सदनिकांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या सदनिकांवर घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी बेकायदेशीररीत्या कब्जा करून भाड्याने देत आर्थिक लाभ घेतल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी संबंधित सदनिका सील करण्याचे आदेश दिले आहेत.
Marathi Breaking news live updates: पुणे पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून तब्बल १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बदल्यांमध्ये ६ गुन्हे शाखेचे निरीक्षक समाविष्ट आहेत. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बदली अनुक्रमे कंट्रोल आणि वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.