Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: बंगालमध्ये पावसाचा धुमाकूळ, शाळा-कॉलेज बंद

काय आहेत आजच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर. देशभरात आणि जगभरात घडणाऱ्या इत्यंभूत बातम्या तुम्ही नवराष्ट्रच्या या ब्लॉगमध्ये वाचू शकता. जाणून घ्या महत्त्वाची बातमी आणि माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 24, 2025 | 07:03 PM
Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात

Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात

Follow Us
Close
Follow Us:

हवामान खात्याने अनेक बाधित राज्यांसाठी एक नवीन अंदाज जारी केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत कोलकातावासीयांना मुसळधार ते अति मुसळधार पावसापासून मुक्तता मिळणार नाही. नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता, सरकारने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. वाचा सविस्तर वृत्त 

The liveblog has ended.
  • 24 Sep 2025 07:00 PM (IST)

    24 Sep 2025 07:00 PM (IST)

    अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; "अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ..."; नितेश राणेंचे महत्वाचे आदेश

    मुंबई: अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करून आणि मत्स्यव्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी, असे आदेश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.

  • 24 Sep 2025 06:55 PM (IST)

    24 Sep 2025 06:55 PM (IST)

    Ajit Pawar Solapur Visit: शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर सरकार, तात्काळ मदतीचे आदेश; उपमुख्यमंत्री अजित पवार

    Solapur News : मोहोळ परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून कार्यवाही करावी, तसेच सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासन दरबारी पाठवावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

  • 24 Sep 2025 06:39 PM (IST)

    24 Sep 2025 06:39 PM (IST)

    Marathwada Rain: “सगळे जण शेतकऱ्यांच्या बांधावर…”; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?

    Chitra Wagh: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत तोकडी असल्याची टीका केली जात आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे.

  • 24 Sep 2025 06:33 PM (IST)

    24 Sep 2025 06:33 PM (IST)

    Thane News : “दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना…”, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

    ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून कळवा, मुंब्रा भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडविण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगर पालिकेवर धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत विरोधीपक्ष नेते शानू पठाण आणि कळवा, मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. गणेशोत्सवात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, आता नवरात्रोत्सवातही पाणी टंचाई आहे. आता आम्ही तुम्हाला दरऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर, नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही. तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू, असा इशारा यावेळी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

  • 24 Sep 2025 06:12 PM (IST)

    24 Sep 2025 06:12 PM (IST)

    Ashes 2025 मालिकेसाठी इंग्लंड संघ घोषित जाहीर! ‘या’ घातक गोलंदाजाचे पुनरागमन; वाचा कुणाची लागली वर्णी…

    AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२५-२६ अ‍ॅशेससाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बेन स्टोक्स संघाची धुरा सांभाळणार असून हॅरी ब्रूकची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंड नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.

  • 24 Sep 2025 05:56 PM (IST)

    24 Sep 2025 05:56 PM (IST)

    साई पल्लवी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या रडारवर

    साडीतली साधी, संस्कारी आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या रडारवर आली आहे. कारण? तिने समुद्रकिनारी घातलेला स्विमसूट. साई पल्लवी आपल्या बहिणीसोबत म्हणजेच पूजा कन्ननसोबत बीच व्हेकेशनवर गेली होती. पूजाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यात दोघी बहिणी मिळून समुद्रकिनारी धमाल करताना दिसतात. त्या फोटोंमध्ये साई पल्लवीने स्विमसूट घातला होता. पण, काही सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी या फोटोंवर टीका केली आहे.

  • 24 Sep 2025 05:42 PM (IST)

    24 Sep 2025 05:42 PM (IST)

    BSA Gold Star बाईकवर दमदार डिस्काउंट

    कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवाच्या काळात बीएसए मोटरसायकल खरेदीवर ग्राहकांना हजारो रुपयांची बचत होणार आहे. या काळात बाईकची किंमत जीएसटी 2.0 लागू होण्यापूर्वीचीच ठेवण्यात आली आहे.निर्मात्याने बीएसए गोल्ड स्टार बाइक 3.10 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत ऑफर केली आहे. याच्या टॉप व्हेरिएंट बीएसए लिगसी शीन सिल्व्हर ची किंमत 3.45 लाख रुपये एक्स-शोरूम इतकी आहे. याशिवाय, गोल्ड स्टार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लिमिटेड एडिशन ॲक्सेसरीज किट मोफत दिले जाणार आहे.

  • 24 Sep 2025 05:30 PM (IST)

    24 Sep 2025 05:30 PM (IST)

    अजित पवारांच्या निकटवर्तीयाला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

    जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुख यांना पोलिसांनी अटक केली आहे.2022 मध्ये दाखल गुन्ह्यात व्यवसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे.

  • 24 Sep 2025 05:14 PM (IST)

    24 Sep 2025 05:14 PM (IST)

    बाजार कोसळला, सेन्सेक्स ३८६ अंकांनी घसरला, निफ्टी २५,१०० खाली

     बुधवारी सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, दोन्ही बेंचमार्क निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स ३८६ अंकांनी घसरला, तर निफ्टी ५० ११३ अंकांनी घसरला. बुधवारी, सेन्सेक्स ८२,९१७ वर उघडला आणि ०.४७ टक्क्यांनी घसरून ८१,७१५ वर बंद झाला. निफ्टी ५० देखील २५,१०८ वर उघडला आणि ०.४५ टक्क्यांनी घसरून २५,०५६ वर बंद झाला.

  • 24 Sep 2025 05:13 PM (IST)

    24 Sep 2025 05:13 PM (IST)

    मोठी बातमी! तिहार जेलमधून Afzal Guru ची कबर हटवणार? HC ने दिला ‘हा’ मोठा निर्णय

    Delhi Highcourt: तिहार जेलमध्ये दहशतवादी अफजल गुरूला फाशी देण्यात आली होती. तिहार तुरुंगात त्याची कबर बांधण्यात आलेली आहे. दरम्यान दिल्ली हायकोर्टात तिहार जेल परिसरात असणारी अफजल गुरुची कबर हटवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.

  • 24 Sep 2025 05:05 PM (IST)

    24 Sep 2025 05:05 PM (IST)

    विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट

    अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी अखेर त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे, हे दोघंही लवकरच पालक होणार आहेत. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.जी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.  अक्षयनं कतरिनाच्या पोस्टखाली कमेंट केली आहे की, “कैतरीना आणि विकी, तुमच्यासाठी मी खूप आनंदी आहे. मी जेवढं तुम्हाला ओळखतो, त्यानुसार मला खात्री आहे की तुम्ही दोघेही उत्तम आई-बाबा व्हाल,फक्त एका विनंती आहे. बाळाला इंग्रजी आणि पंजाबी दोन्ही शिकवा! भरपूर प्रेम आणि आशीर्वाद! जय महादेव!” असा खास सल्ला दिला आहे

  • 24 Sep 2025 03:57 PM (IST)

    24 Sep 2025 03:57 PM (IST)

    India Politics: बिहारच्या राजकारणात यादवांचा ‘अस्त’ होणार? ‘या’ घोटाळ्यात कोर्टाने दिला महत्वाचा आदेश

    Bihar Election 2025: लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्च पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान निवडणुकीआधीच लालू यादव, तेजस्वी यादव आणि रबडी यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आयआरसीटीसी घोटाळ्यात 13 ऑक्टोबर रोजी कोर्ट निर्णय देणार आहे.

  • 24 Sep 2025 03:45 PM (IST)

    24 Sep 2025 03:45 PM (IST)

    पाकिस्तानी खेळाडू आपटला तोंडावर! हसरंगाला डिवचणे पडले महागात!

    Asia cup 2025 : आशिया कप २०२५ मधील तिसऱ्या सुपर ४ सामन्यात काल म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी  पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ५ विकेट्सने पराभव केला. पाकिस्तान संघाची आशिया कपमध्ये आतापर्यंत निराशाजनक राहिली होती.

  • 24 Sep 2025 03:39 PM (IST)

    24 Sep 2025 03:39 PM (IST)

    OFBL च्या संधीला मुकू नका! आज शेवटची तारीख…

    जर तुम्ही सरकारी नोकरी करू पाहत आहात तर OFBL ची संधी सोडू नका. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आज या भरतीसाठी शेवटची तारीख आहे. यानंतर अर्ज करता येणार नाही. ऑर्डिनन्स फॅक्टरी बडमाल (Ordnance Factory Badmal – OFBL) तर्फे अप्रेंटिसच्या 42 पदांसाठी भरती जाहीर झाली होती.

  • 24 Sep 2025 03:30 PM (IST)

    24 Sep 2025 03:30 PM (IST)

    बदलापूरमधील पोलिसाचाच मेल हॅक; ऑनलाईन फसवणुकीत तब्बल 13 लाखांचा गंडा

    ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. पोलिसांकडूनच वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र आता पोलिसच ऑनलाईन फसवणूकीचा शिकार झाल्याचे समोर आले आहे. बदलापूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून जवळपास १३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • 24 Sep 2025 03:20 PM (IST)

    24 Sep 2025 03:20 PM (IST)

    मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट

    मिलान फॅशन वीक 2025 मध्ये आलिया भट्ट आणि BTS चा सदस्य जिन यांची एकत्र हजेरी चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण ठरला. त्यांची ही अनपेक्षित उपस्थिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि या फॅशन सीझनमधील सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरली. मिलान फॅशन वीक 2025 मध्ये आलिया भट्टने आपल्या दमदार आणि स्टायलिश लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

  • 24 Sep 2025 03:14 PM (IST)

    24 Sep 2025 03:14 PM (IST)

    वैभव सूर्यवंशीची ऑस्ट्रेलियात विक्रमी कामगिरी

    आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक कामगिरीने सगळ्याना वेड लावणारा वैभव सुर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) ऑस्ट्रेलियामध्ये कहर केला आहे. भारताच्या १९ वर्षांखालील आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघांमधील दुसरा युवा एकदिवसीय सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे.

  • 24 Sep 2025 03:02 PM (IST)

    24 Sep 2025 03:02 PM (IST)

    PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची होणार भेट?

    भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) नुकतेच अमेरिकेला संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ८० व्या अधिवेशनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी समकक्ष अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली.

  • 24 Sep 2025 02:50 PM (IST)

    24 Sep 2025 02:50 PM (IST)

    Leh Protest: लेहमध्ये हिंसाचार! ‘या’ मागणीसाठी भाजप ऑफिस पेटवले अन्…; नेमके प्रकरण काय?

    BJP Office in Leh: केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात मोठी झटापट झाली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला संपरून राज्याचा दर्जा द्यावा यासाठी या ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले. पर्यावरणवादी सोनम वांगचूक हे गेल्या 15 दिवसांपासून उपोषण करत आहेत. आंदोलकांनी भाजप कार्यालयचे पेटवून दिले आहे. नेमके काय घडले ते आपण जाणून घेऊयात.

  • 24 Sep 2025 02:50 PM (IST)

    24 Sep 2025 02:50 PM (IST)

    अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटगृहात री-रिलीज

    प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक अनुपम खेर यांचा खूप आवडलेला दिग्दर्शकीय चित्रपट, ‘तन्वी द ग्रेट, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. धैर्य, सर्वसमावेशकता आणि कुटुंबाचा एक भावनिक पण आनंदी उत्सव साजरा करणारा हा चित्रपट, असा दुर्मिळ मनोरंजनपर सिनेमा म्हणून परत येत आहे, जो प्रत्येक पिढीतील प्रेक्षक एकत्र पाहू शकतात.

  • 24 Sep 2025 02:45 PM (IST)

    24 Sep 2025 02:45 PM (IST)

    पापा की परी, आता जा घरी…! Video Viral

    सोशल मिडियाच्या दुनियेत एक नवीन मजेदार व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये इतकी मजेदार आहेत की ती पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. ‘नजर हटी तो दुर्घटना घटी’ ही म्हण तर तुम्ही नक्कीच ऐकली असेल. सध्या या म्हणीचीच प्रचीती देणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात खरंतर एका मुलीसोबत एक दुर्घटना घडून आली आहे पण ही घटना इतक्या वेगात घडते की याला काहीसे हास्यास्पद रुप प्राप्त होते. मुलीसोबत घडलेली ही घटना तुमच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू दोन्ही आणेल. चला तर मग नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

  • 24 Sep 2025 02:39 PM (IST)

    24 Sep 2025 02:39 PM (IST)

    बांगलादेशविरुद्ध हार्दिक पंड्याला विक्रमाची नामी संधी!

    Asia cup 2025 : आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत ३ सुपर ४ सामने खेळून झाले आहेत. आज भारत आणि बांगलादेश यांच्यातील चौथा सुपर ४ सामना आज, २४ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही आशियाई संघ या स्पर्धेत आपला पहिला सुपर ४ सामना जिंकून आले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अंतिम फेरीच्या दिशेने पाऊल भक्कम करण्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान, भारतीय संघातील अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

  • 24 Sep 2025 02:30 PM (IST)

    24 Sep 2025 02:30 PM (IST)

    दिल्लीत मोठी जबाबदारीपासून पक्षातील छुपा विरोधापर्यंत..

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये मोठी जबाबदारी स्वीकारून दिल्लीला जाणार असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात, याबाबत वेळोवेळी चर्चा होतात. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतरही देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय मंत्री होणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यानंतरही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी दिल्लीत मंत्रीपदाच्या ऑफर आणि चर्चांवर भाष्य केलं आहे.

  • 24 Sep 2025 02:25 PM (IST)

    24 Sep 2025 02:25 PM (IST)

    “मला रक्तानं लिहिलेलं पत्र आलं होतं”, ‘विवाह’ फेम अमृता रावने सांगितला धक्कादायक अनुभव

    बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता राव. तिने आपल्या अभिनयातून अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटात झळकत असून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चित्रपटातील ‘पूणम’ या भूमिकेमुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. अलीकडेच तिने रणवीर अल्लाहबादिया याच्या पॉडकास्टमध्ये या चित्रपटाबद्दल खास अनुभव शेअर केले आहेत. यावेळी ती म्हणाली, ”‘विवाह’नंतर मला अनेक एनआरआय यांची स्थळं यायची. लोक माझ्या घराखाली गाडी घेऊन उभे असायचे आणि माझ्याशी लग्न कर, असं म्हणायचे. एक-दोन नाही, तर मला अशी अनेक स्थळं आली होती. त्यावेळी मी हे बघून हसायचे आणि वाटायचं की, कशी माणसं आहेत ही”.

  • 24 Sep 2025 02:20 PM (IST)

    24 Sep 2025 02:20 PM (IST)

    कामावरून काढल्याचा बदला! २ मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण

    पुणे: पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कामावरून काढल्याचा रागातून दोन मजुरांनी बदला घेण्यासाठी ठेकेदाराच्या मुलीचा अपहरण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिला इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये चढवलं. पोलिसांनी काही तासातच तीन वर्षाच्या मुलीची सुटका केली असून आरोपींना अटक केली आहे.

  • 24 Sep 2025 02:05 PM (IST)

    24 Sep 2025 02:05 PM (IST)

    भारत-पाकिस्तान संबंधात तुर्कीच्या एर्दोगानची पुन्हा लुडबूड

    Turkey on India-Pakistan Kashmir Dispute : इस्तंबूल : मंगळवारी (२३ सप्टेंबर)न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेचे(UNGA) ८० वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात जगभरातली अनेक देशांचे मंत्री उपस्थित होते. यावेळी तुर्कीचे (Turkey) राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगानही उपस्थित होते. यावेळी त्यांनी इस्रायल आणि हमास युद्धावर (Israel Hamas War) आले मत मांडले. तसेच त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संबंधावरही भाष्य केले.

  • 24 Sep 2025 01:50 PM (IST)

    24 Sep 2025 01:50 PM (IST)

    Maharashtra Rain Alert: पाऊस इतका का पेटलाय? ‘या’ तारखेपासून राज्यात प्रचंड…; शेतकऱ्यांवर मोठे संकट येणार

    IMD Rain Alert: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा, विदर्भात तर पावसाने नुसता धुमाकूळ घातला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभगाने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

  • 24 Sep 2025 01:50 PM (IST)

    24 Sep 2025 01:50 PM (IST)

    साई पल्लवी-अनिरुद्ध रविचंदर कलईमामणी पुरस्कारांनी सन्मानित, तामिळनाडू सरकारने केली घोषणा

    तामिळनाडू सरकारने बुधवारी कला आणि संस्कृतीतील योगदानासाठी भारतीयार, एमएस सुब्बुलक्ष्मी आणि कलईमामणी पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार २०२१, २०२२ आणि २०२३ या वर्षांसाठी कलाकारांना दिले जातील. गायक केजे येसुदास यांना संगीतातील योगदानासाठी एमएस सुब्बुलक्ष्मी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अभिनेत्री साई पल्लवी यांनी कलैमामणी पुरस्कार जिंकला आहे.

  • 24 Sep 2025 01:45 PM (IST)

    24 Sep 2025 01:45 PM (IST)

    “माझी आईच माझ्यासाठी स्त्रीशक्तीचं रूप आहे”, अभिनेत्री पूजा रायबागीने नवरात्रीनिमित्त व्यक्त केल्या भावना

    नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या नऊ रूपांच्या आराधनेतून प्रत्येक स्त्रीतील सामर्थ्य, करुणा आणि जिद्द जागी होते. या दिवसांत भक्ती, नृत्य आणि आनंदाचा जल्लोष असतो, पण त्यासोबतच स्त्रीशक्तीचं तेज साजरं करण्याची संधी मिळते. प्रत्येक स्त्री हीच देवीचं रूप आहे, आणि नवरात्र म्हणजे त्या रूपाला सलाम. ‘सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेतील अवंती म्हणजेच अभिनेत्री पूजा रायबागीने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग चाहत्यांसह शेअर केला आहे.

  • 24 Sep 2025 01:40 PM (IST)

    24 Sep 2025 01:40 PM (IST)

    चैतन्यानंद सरस्वतीपासून आसाराम बापू पर्यंत…; या बाबांवर लागलेत बलात्काराचे आरोप

    दिल्लीतील वसंत कुंज येथील एका प्रसिद्ध आश्रमाचे प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर १५ महिला विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर वसंत कुंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पण त्याचवेळी चैतन्यनंद सरस्वती सध्या फरार असल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्या व्होल्वो कारवर बनावट नंबर प्लेट आढळली, जी जप्त करण्यात आली आहे. चैतन्यनंद सरस्वती हे पहिले बाबा नाहीत ज्यांच्यांवर महिलां अत्याचाराशी संबंधित गुन्हा दाखल झाला आहे.

  • 24 Sep 2025 01:35 PM (IST)

    24 Sep 2025 01:35 PM (IST)

    बादशाह झाला जखमी, डोळ्यावर दिसली बांधलेली पट्टी; फोटो पाहून चाहते चकीत

    प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अचानक बादशाह अशा अवस्थेत दिसला की लोक त्याच्याबद्दल काळजी करू लागले आहेत. बादशाहचा चेहरा बदलेल चाहत्यांना दिसत आहे. त्याच्या एका डोळ्याला दुखापत झालेली दिसते आहे. जणू कोणीतरी त्याला जोरात मुक्का मारला आहे. त्याचा डोळा इतका सुजला आहे की तो पूर्णपणे उघडूही शकत नाही आहे. आता, बादशाह या अवस्थेत कसा आला? सर्वांना हे जाणून घ्यायचे आहे. गायकाची अवस्था पाहून सगळेच थक्क झाले आहेत. त्याला नक्की काय झाले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • 24 Sep 2025 01:25 PM (IST)

    24 Sep 2025 01:25 PM (IST)

    नवीन H1B Visa शुल्कामुळे दरमहा 5,500 नोकऱ्या जाऊ शकतात, भारतीयांना सर्वाधिक फटका

    जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीचे अर्थशास्त्रज्ञ अबियेल राइनहार्ट आणि मायकेल फेरोली यांच्या अंदाजानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या नवीन $१००,००० H-१B व्हिसाच्या अर्ज शुल्कामुळे दरमहा सुमारे ५,५०० नोकऱ्या (स्थलांतरित कामाचे अधिकार) कमी होऊ शकतात. एकूण अमेरिकन कामगार बाजाराच्या तुलनेत ही संख्या “महत्त्वपूर्ण” वाटत असली तरी, अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की तंत्रज्ञान कंपन्या आणि भारतीय कामगारांना याचा सर्वाधिक फटका बसेल.

  • 24 Sep 2025 01:15 PM (IST)

    24 Sep 2025 01:15 PM (IST)

    सुपर – 4 मध्ये भारताविरूद्ध बांगलादेशचा निभाव लागणार? कसा आहे रेकॉर्ड

    २०२५ च्या आशिया कपच्या सुपर फोरमध्ये भारतीय संघाचा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. या स्पर्धेत ते पहिल्यांदाच एकमेकांसमोर येतील. बांगलादेशने त्यांचा पहिला सुपर फोर सामना श्रीलंकेविरुद्ध जिंकला. दरम्यान, भारत स्पर्धेत अपराजित राहिला आहे. लीग टप्प्यात त्यांचे तिन्ही सामने जिंकल्यानंतर, त्यांनी सुपर फोरमध्ये पाकिस्तानला हरवले.

  • 24 Sep 2025 01:08 PM (IST)

    24 Sep 2025 01:08 PM (IST)

    ‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार

    इराणच्या (Iran) अणु कार्यक्रमावरुन पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद निर्माण झाला आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इराणच्या अणु कार्यक्रमावर पुन्हा निर्बंध लादण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे इराणने संताप व्यक्त केला आहे. तसेच अमेरिकेशी (America) न्यूक्लियर प्रकल्पावर कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे.इराणचे सर्वाच्च नेते अयातुलला अली खामेनी यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेशी अणु कार्यक्रमावर थेट चर्चेसाठी नकार दिला आहे. इराणच्या मते, यामुळे त्यांच्यावर पुन्हा निर्बंध लादले जातील.

  • 24 Sep 2025 01:00 PM (IST)

    24 Sep 2025 01:00 PM (IST)

    पुण्यात समलैंगिक विवाह, नंतर आईवडिलांच्या दबावात नाशिकच्या तरुणासोबत लग्न

    नाशिकमधून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. पुण्यात तरुणीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केला, त्यानंतर नाशिकच्या तरुणाशी लग्न करत त्याची फसवणूक केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात तरुणीच्या आई वडिलांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 24 Sep 2025 12:45 PM (IST)

    24 Sep 2025 12:45 PM (IST)

    ७ जणांकडून सामूहिक अत्याचार करून अल्पवयीनचा व्हिडीओ वायरल

    कल्याण येथुन एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर मैत्री करणं चांगलाच भोवलं आहे. अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री करून ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. एवढंच नाही तर या नराधम आरोपींनी तिच्यासोबत संबंध प्रस्तापित करून तिचा व्हिडीओ तयार केला आणि तो आपल्या मित्रतांना पाठवला. तिला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ महिने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

  • 24 Sep 2025 12:38 PM (IST)

    24 Sep 2025 12:38 PM (IST)

    कांदिवलीत भीषण आग, सात जण गंभीर जखमी

    कांदिवली (पूर्व) येथे मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत आज सकाळी लागलेल्या आगीत सात जण गंभीर जखमी झाले. ही आग सकाळी ९.०५ वाजता लागली होती. मुम्बई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.आग ग्राउंड +१ मजल्याच्या दुकानात लागली होती. घरातील वीजजोडणी, एलपीजी गॅस सिलिंडर लिकेज् झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आगीत सात जण भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि समता नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • 24 Sep 2025 12:30 PM (IST)

    24 Sep 2025 12:30 PM (IST)

    23 वर्षीय मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या

    मुंबईतून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत तक्षशिला परिसरात डबल मर्डर झाल्याची घटना समोर आली आहे. मुलानेच आपल्या वडील आणि आजोबाची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्यारा हा फक्त २३ वर्षाचा आहे. त्याने चाकूने वार करत हत्या केली. या हल्ल्यात त्याचा काका जखमी झाला आहे.

  • 24 Sep 2025 12:15 PM (IST)

    24 Sep 2025 12:15 PM (IST)

    कांदिवली हादरलं! ज्येष्ठ व्यावसायिकाचा सुपारी देऊन खून

    कांदिवली पश्चिमेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ व्यावसायिकाच्या हत्येचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहेत. या कटात व्यावसायिकाच्या मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचा नाव ६७ वर्षीय मोहम्मद आयुब मोहम्मद युनूस सय्यद असे आहे. त्यांची हत्या त्यांच्या कार्यालयामध्ये धारदार शास्त्राने वार करून करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून मुलगा हा फरार आहे.

  • 24 Sep 2025 12:05 PM (IST)

    24 Sep 2025 12:05 PM (IST)

    बुलढाणा हादरलं! हॉटेलमध्ये आढळला प्रेमीयुगुलाचा मृतदेह

    एका हॉटेलमध्ये तरुण व तरुणीचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला आले आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे घडली आहे. हॉटेलमध्ये मृतक दुपारपासून थांबलेले असल्याची माहिती देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली.

  • 24 Sep 2025 11:48 AM (IST)

    24 Sep 2025 11:48 AM (IST)

    H-1B Visa : ट्रम्प प्रशासनाकडून एच-१बी व्हिसा नियमात आणखी एक बदल

    ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाच्या निवड प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. पूर्वी H-1B व्हिसा हा व्हिसा लॉटरी सिस्टिम द्वारे दिला जात होता. पण आता ही सिस्टिम बंद करण्यात येणार असून केवळ जास्त पगार असलेल्या नोकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. पण याचा फटका भारताच्या छोट्या आयटी कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण या कंपन्या कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवतात.

  • 24 Sep 2025 11:30 AM (IST)

    24 Sep 2025 11:30 AM (IST)

    केंद्र सरकारकडून 10 हजार कोटींची मागणी - संजय राऊत

    खासदार संजय राऊत म्हणाले की, 70 लाख एकरवर जमिनीवरची पिकं उद्धवस्त झाली आहेत. शेतकऱ्याच घर, पशुधन नष्ट झालेलं आहे. साधारण 36 लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आता 36 लाख शेतकऱ्यांची पिकं, पशुधन, घरदार, गावच्या गावं वाहून गेलेली आहेत. 9 लाख कोटीच कर्ज असलेल्या या सरकारने 2215 कोटी रुपये कागदावर मंजूर केलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून 10 हजार कोटींची मागणी केली. ती मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही”  असे संजय राऊत म्हणाले आहेत.

  • 24 Sep 2025 11:15 AM (IST)

    24 Sep 2025 11:15 AM (IST)

    रोहित पवारांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

    कर्जत जामखेड मतदारसंघातील खर्डा, तरडगाव, जायभायवाडी (ता. जामखेड), सितपूर, नागापूर, नागलवाडी, निंबोडी, मलठण (ता. कर्जत) या भागातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, माझा शेतकरी आज अडचणीत आहे आणि याप्रसंगी त्याला धीर देण्याची नितांत गरज आहे. या भेटीतून बळीराजाशी चर्चा केली आणि या संकटातून सावरण्यासाठी धीर दिला. यावेळी माझे सहकारी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते,

  • 24 Sep 2025 11:05 AM (IST)

    24 Sep 2025 11:05 AM (IST)

    ‘हिंदुस्तानी जलपरी’आरती साहा यांचा जन्मदिन

    भारताची अशी एक तरुणी जिने इंग्लिश खाडी पोहून सर्वांना अचंबित केले होते त्या म्हणजे आरती साहा. आरती साहा यांचा जन्म २४ सप्टेंबर १९४० रोजी कोलकाता येथे झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी पोहायला सुरुवात केली होती. त्या एक प्रसिद्ध भारतीय जलतरणपटू होत्या. त्यांनी १९५९ मध्ये इंग्लिश चॅनल पोहून पार करणारी पहिली भारतीय आणि आशियाई महिला होण्याचा मान मिळवला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवल्यामुळे त्यांची संपूर्ण विश्वामध्ये चर्चा झाली. ३ ऑगस्ट १९९४ रोजी आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. मात्र आरती साहांना त्यांच्या या पराक्रमी जलतरण कामगिरीमुळे “हिंदुस्तानी जलपरी” म्हणून कायमची ओळख मिळवली. 

  • 24 Sep 2025 11:00 AM (IST)

    24 Sep 2025 11:00 AM (IST)

    ICC ने USA क्रिकेट सदस्यत्व केले निलंबित, काय आहे कारण

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी यूएसए क्रिकेटचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले. यूएसए क्रिकेटने सातत्याने कर्तव्यांचे उल्लंघन केल्यामुळे आणि खेळाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली. वर्षभराच्या आढावा आणि भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कौन्सिलने म्हटले आहे की यूएसए क्रिकेट प्रभावी प्रशासन संरचना लागू करण्यात, यूएस ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक समिती (USOPC) कडून मान्यता मिळविण्यात आणि ऑपरेशनल सुधारणा लागू करण्यात अपयशी ठरले आहे.

  • 24 Sep 2025 10:50 AM (IST)

    24 Sep 2025 10:50 AM (IST)

    23 वर्षीय मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या

    रात्री दारू पियुन वडील पैसे आणि शिवीगाळ करत होते. तेव्हा मुलाने ५२ वर्षीय वडिलांची हत्या केली. त्यानंतर ७५ वर्षीय आजोबा वर वार केले. ४५ वर्षीय काका भांडण सोडवायला गेले तेव्हा त्यांच्यावर देखील मुलाने चाकूने हल्ला केला. मुलाचा या हल्ल्यात काकासुद्धा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहे.

  • 24 Sep 2025 10:40 AM (IST)

    24 Sep 2025 10:40 AM (IST)

    सतत स्क्रिन पाहून डोळ्यांवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी घरगुती उपाय

    घरगुती उपाय केल्यामुळे डोळ्यांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. यासाठी अतिशय सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा डोळ्यांवर काकडी किंवा काकडीचा रस लावणे. काकडीमध्ये असलेल्या पाण्यामुळे डोळ्यांमधील उष्णता कमी होते आणि डोळे कायमच सुंदर दिसतात. रात्री झोपण्याआधी काकडीचे पातळ तुकडे करून डोळ्यांवर ठेवावे. यामध्ये असलेल्या पाण्यामुळे डोळ्यांवर वाढलेला तणाव कमी होतो. काकडी डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्यांभोवती आलेली सूज, काळे डाग आणि त्वचा अतिशय मुलायम होण्यास मदत होते.

  • 24 Sep 2025 10:35 AM (IST)

    24 Sep 2025 10:35 AM (IST)

    8 वर्षांच्या मुलीच्या तोंडात अडकला च्युइंगम, जीव गुदमरत होता पण ....

    व्हायरल व्हिडिओमध्ये एक ७ वर्षांची मुलगी तिच्या सायकलवर उभी असल्याचे दिसते. यावेळी काही तरुण छोट्या टेम्पोमध्ये काही सामान भरण्यात मग्न होते. दोन तरुण दुचाकीवर बसून कुठेतरी जात असतात आणि याचवेळी मुलगी अस्वस्थ होऊन त्यांच्याजवळ जाते. मुलीच्या तोंडात च्युइंगम अडकल्याने ती जरा अस्वस्थ झालेली असते. तिला अशा अवस्थेत पाहताच सर्व तरुण मिळून तिची मदत करण्याता निर्णय घेतात. ते तिचं डोक खाली करुन आणि तिच्या पाठीवर थाप मारुन हा च्युइंगम बाहेर करण्याचा प्रयत्न करतात ज्यात ते यशस्वीही होतात. काहीवेळाच्या संघर्षानंतर हा च्युइंगम यशस्वीरीत्या बाहेर पडतो. तरुणांच्या या मदतीने वेळीच मुलीचा जीव वाचला अन्यथा मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता होती.

  • 24 Sep 2025 10:30 AM (IST)

    24 Sep 2025 10:30 AM (IST)

    Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य

    Oppo A6 Pro स्मार्टफोन Oppo A6 सीरीजचे एक नवीन एडिशन आहे, ज्यामध्ये आतापर्यंत Oppo A6 Pro 5G, Oppo A6 GT आणि Oppo A6i सारख्या 5G मॉडल्सचा समावेश आहे. आता या सिरीजमधील आणखी एक नवीन डिव्हाईस कंपनीने लाँच केलं आहे. नवीन हँडसेटमध्ये 7,000mAh बॅटरीसह 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनच्या 5G वर्जनसारखेच आहेत. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A6 Pro 4G ला डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शनसाठी IP69 रेटिंग मिळाली आहे.

  • 24 Sep 2025 10:25 AM (IST)

    24 Sep 2025 10:25 AM (IST)

    ज्येष्ठ व्यावसायिकाचा सुपारी देऊन खून; मुलगाच ठरला कटात सहभागी

    कांदिवली पश्चिमेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ व्यावसायिकाच्या हत्येचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहेत. या कटात व्यावसायिकाच्या मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचा नाव ६७ वर्षीय मोहम्मद आयुब मोहम्मद युनूस सय्यद असे आहे. त्यांची हत्या त्यांच्या कार्यालयामध्ये धारदार शास्त्राने वार करून करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून मुलगा हा फरार आहे.

Web Title: Marathi news live updates breaking news political entertainment national international updates 24th september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • Breaking News
  • maharashra news
  • Marathi Batmya

संबंधित बातम्या

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी
1

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

जात वैधतेसाठी यवतमाळमध्ये उसळली मोठी गर्दी! आत्तापर्यंत दोनशे अर्ज आणि पोचपावतीसाठी मोठी धडपड
2

जात वैधतेसाठी यवतमाळमध्ये उसळली मोठी गर्दी! आत्तापर्यंत दोनशे अर्ज आणि पोचपावतीसाठी मोठी धडपड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.