Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 14.10.2026
Maharashtra to World Breaking News : मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष NIA न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर करण्यामागील न्यायालयाची सविस्तर कारणे आणि त्यासाठी घालण्यात आलेल्या अटींची माहिती विस्तृत आदेश समोर आल्यानंतर स्पष्ट होईल.
राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’चा मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची विशेष पथके लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात १,४०५ टन वजनाचा आणि १०० मीटर लांबीचा पहिला पोलादी पूल यशस्वीरीत्या उभारण्यात आला. आशियाई खेळामध्ये भारताच्या ईशा सिंगने २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक पटकावत भारताच्या पदकांची संख्या वाढवली.
भाद्रपद कृष्ण अंगारक चतुर्थीनिमित्त राज्यातील प्रमुख गणपती मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज.
29 Sep 2026 04:57 PM (IST)
निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा निघणार आहे. भायखळ्यातूल क्रुडास कंपंनीच्या गेटपासून मुंबई महापालिकेपर्यंत हा मोर्चा निघेल. मोर्चा महापालिकेसमोर पोहचल्यानंतर तिथे सभा होईल. सकाळी ११ वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल निवडणूक आयोगाच्या विरोधातील हा मोर्चा असल्याने या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हा मोर्चा असल्याने हातात फक्त तिरंगा झेंडा असावा,” अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली आहे.
29 Sep 2026 04:47 PM (IST)
सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव या तालुक्यांचा दुष्काळी क्षेत्रात समावेश करून शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. वाचा सविस्तर...
29 Sep 2026 04:40 PM (IST)
मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष NIA न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर करण्यामागील न्यायालयाची सविस्तर कारणे आणि त्यासाठी घालण्यात आलेल्या अटींची माहिती विस्तृत आदेश समोर आल्यानंतर स्पष्ट होईल. वाचा सविस्तर...
29 Sep 2026 04:22 PM (IST)
खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तक्रारदारासह साक्षीदार आणि पंचांनी आरोप नाकारल्याने सरकारी पक्षाला पुरावे सादर करता आले नाहीत. पुराव्याअभावी न्यायालयाने घायवळसह सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय दिला.
29 Sep 2026 04:18 PM (IST)
पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत पुरुष वर्ल्डकपचे आयोजन आयसीसीकडून करण्यात येत आहे. वर्ल्डकपची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहते आतुरतेने या महाकुंभाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान आयसीसी आता लवकरच वर्ल्डकपबाबत मोठी घोषणा करणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 ला दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउनमध्ये आयसीसी वर्ल्ड कप 2027 चा कार्यक्रम जाहीर करणार आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि झिम्बाब्वे या ठिकाणी वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. दरम्यान 1 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी आयसीसी 2027 पुरुष वर्ल्डकपचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे. बरोबर पुढील वर्षी एका वर्षाने ऑक्टोबरच्या सुमारास वर्ल्डकप सुरू होणार आहे. वाचा सविस्तर...
29 Sep 2026 03:59 PM (IST)
नवनीत राणा नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणी दौऱ्यावर बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी साधला संवादसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी -नवनीत राणा
29 Sep 2026 03:55 PM (IST)
हॉटेलच्या जागेच्या वादातून भीषण हाणामारी शिरुरमधील पाषाणमळा परिसरातील घटना तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल जखमींवर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार
29 Sep 2026 03:45 PM (IST)
सिंधुदुर्गात पाणी संवर्धनाचा शुभारंभ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कसली कंबर 10 हजार वनराई बंधारे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प
29 Sep 2026 03:35 PM (IST)
FDA Action On 122 Year Old Cafe : महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सध्या FDA च्या कारवाया सुरुच आहेत. नुकतंच मुंबईतील सुप्रसिद्ध असलेलं जवळपास 122 वर्षे जुनं असलेलं क्यानी अँड कंपनी या कॅफेवर FDA ने धाड टाकली. या कारवाईत धक्कादायक बातमी समोर आला. 122 वर्षापासून सेवेत असलेला हा लोकप्रिय कॅफेमध्ये भयानक आणि किळसवाण चित्र दिसल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDA ने या कारवाईत कॅफेचा परवाना देखील निलंबित केला आहे. नेमकं काय चित्र समोर आलं? ( FDA Action On 122 Year Old Cafe )
29 Sep 2026 03:30 PM (IST)
सोलापूर : दुष्काळाची दाहकता वाढत असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. तुळशी गाव गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करत असून, वारंवार मागणी आणि आंदोलने करूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी थेट गावच ‘विक्रीला’ काढले असून, संपूर्ण गावात ‘गाव विकणे आहे’ असे फलक लावण्यात आले आहेत.
29 Sep 2026 03:25 PM (IST)
एशियन गेम्समध्ये (Asian Games 2026) भारतीय बॉक्सर्सने आपली शानदार कामगिरी कायम राखली आहे. अंकुश पंघालने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सेमिफायनलमध्ये फजलिद्दीन एर्किनबोवचा पराभव करण्यासह फायनल गाठत आपले पदक निश्चित केले आहे.
29 Sep 2026 03:20 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी आंदोलन, उपोषण करण्यात येत आहे. त्यावरच आता मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे. मोडी लिपी वाचण्यासाठी आणि बनवण्यासाठी आम्ही सरकारकडे 63 नावं पाठवली आहेत. सरकारला नोंदी सापडत नव्हत्या. आम्ही दिलेल्या नावांना आता पूर्ण अधिकार देण्यात यावेत. तसेच मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
29 Sep 2026 03:10 PM (IST)
IAS Officer Salary: युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या मनात ट्रेनिंग काळातील पगाराविषयी उत्सुकता असते. उत्तराखंडमधील मसुरी येथील ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी’ (LBSNAA) मध्ये प्रशिक्षण घेत असताना आयएएस अधिकाऱ्यांना मिळणारा पगार आणि इतर आर्थिक लाभांविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
29 Sep 2026 03:01 PM (IST)
Supreme Court Survey: महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील आयुष्य हे अनेकदा अभ्यास, करिअर आणि उज्ज्वल भविष्याशी जोडले जाते. मात्र देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या एका मोठ्या सर्वेक्षणाने या कथेची एक वेगळी बाजू समोर आणली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाने (नॅशनल टास्क फोर्स) केलेल्या सर्वेक्षणात, सुमारे ९ टक्के विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात वारंवार किंवा अनेकदा आत्महत्येचे विचार आल्याचे सांगितले.
29 Sep 2026 02:59 PM (IST)
नंदीग्राम पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार हसी राणी रथ यांच्याविरोधात काँग्रेसने दाखल केलेली याचिका कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा राव यांनी फेटाळून लावली. या प्रकरणातील सविस्तर आदेशाची प्रतीक्षा आहे.
29 Sep 2026 02:50 PM (IST)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या, आम्ही कोणासोबतही जाणार नाही. कोणाला आमच्यासोबत यायचे असेल, तर ते आमच्यासोबत येऊ शकतात, या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांनी जे म्हटले आहे, ते योग्यच आहे. मी देखील यापूर्वी म्हटले होते की, पवार कुठेही जाणार नाहीत. ते इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आणि प्रमुख नेते आहेत आणि ते आमच्यासोबतच राहतील.
29 Sep 2026 02:40 PM (IST)
केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. या दोघांनी मंगळवारी एकत्रित पत्रकार परिषद घेत ४ ऑक्टोबर रोजी एकत्रित मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. निवडणूक आयोग हा एकमेव मोर्चाचा अजेंडा असेल. प्रत्येकाचा हातात तिरंगा असेल. हा लोकशाही आणि संविधान वाचविण्याचा मुद्दा असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
29 Sep 2026 02:31 PM (IST)
अनुसूचित जातीअंतर्गत उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाजाकडून मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सीएसएमटी परिसरात रास्ता रोकोचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात आहे. शासन निर्णय निघेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मातंग समाजातील बांधवांनी घेतली आहे.
29 Sep 2026 02:21 PM (IST)
निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात सामील व्हावं, असं आम्ही सर्व राजकीय पक्षांना, अगदी सत्ताधारी राजकीय पक्षांना पण आमंत्रण देणार आहोत. हा लढा फक्त राजकीय पक्षांचा नाही तर जनतेचा देखील आहे. त्यामुळे जनतेने देखील या मोर्चात मोठ्या संख्येने जरूर सामिल व्हावं, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे.
29 Sep 2026 02:10 PM (IST)
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत मतदार यादीतील प्रत्येक मोठ्या बदलाचा संपूर्ण डेटा सार्वजनिक करण्यात यावा, ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांना त्याची संपूर्ण माहिती आणि अपील करण्याची संधी देण्यात यावी, राजकीय पक्षांना मतदार यादी आणि त्यासंबंधित आवश्यक डेटा साध्या स्वरूपात वेळेत उपलब्ध करून देण्यात यावा, ज्या ठिकाणी गंभीर विसंगतींचे पुरावे समोर येतील, तेथे स्वतंत्र आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाचा डेटा आणि निर्णयांमध्ये अशी पारदर्शकता असावी, अशा मागण्या निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत.
29 Sep 2026 02:00 PM (IST)
सणासुदीच्या काळात, देशभरातील चार्टर्ड अकाउंटंट, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट करदात्यांना एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी मिळाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT ने मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची आणि इनकम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. कोणती नवी तारीख देण्यात आली आहे?
29 Sep 2026 01:55 PM (IST)
पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या ‘प्रिव्ह्यू शो’च्या नावाने आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी सुरू आहे. या प्रकरणात ईडीने माजी मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते इंद्रनील सेन यांच्यासह संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर मंगळवारी सकाळी छापेमारी केली. विविध वृत्तांनुसार, कोलकात्यातील सुमारे १० ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली.
29 Sep 2026 01:45 PM (IST)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी आंदोलन, उपोषण करण्यात येत आहे. त्यावरच आता मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे. मोडी लिपी वाचण्यासाठी आणि बनवण्यासाठी आम्ही सरकारकडे 63 नावं पाठवली आहेत. सरकारला नोंदी सापडत नव्हत्या. आम्ही दिलेल्या नावांना आता पूर्ण अधिकार देण्यात यावेत. तसेच मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
29 Sep 2026 01:35 PM (IST)
राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता माळेगाव (बु.) येथील तावरे पेट्रोल पंप परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी कोयत्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. २८) रात्री घडली आहे. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, माळेगाव पोलिसांनी गणेश भोसले, शुभम मोरे, मयूर रामचंद्र शितोळे, प्रेम कांबळे, हर्षद रणधीर, भुमेश झेंडे यांच्यासह अन्य सहा ते सात जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
29 Sep 2026 01:25 PM (IST)
अनेकदा असं घडतं की, आपण इंस्टाग्रामवर रिल्स स्क्रोल करत असतो आणि अचानक आपल्याला एखादे गाणे किंवा म्युझिक इतके आवडते की वारंवार ऐकण्याची इच्छा होते. काही लोकं तर हे गाणे किंवा म्युझिक आपली रिंगटोन म्हणून देखील सेट करतात. पण रिलचा ऑडिओ आपल्या स्मार्टफोनची रिंगटोन म्हणून कशी सेट करायची याबाबत अनेकांना माहिती नसतं. पण खरं तर अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी ही प्रोसेस अतिशय सोपी आहे. आयओएस 26 मुळे ही प्रोसेस आणखी सोपी झाली आहे. जर तुमच्याकडे आयओएस 26 असलेला आयफोन असेल तर तुम्ही 30 सेकेंद किंवा त्यापेक्षा कमी लांबीची एमपी3 किंवा एम4ए ऑडियो फाईल थेट रिंगटोन म्हणून सेट करू शकता.
29 Sep 2026 01:14 PM (IST)
राज्य शासनाच्या परिवहन विभागाने कामकाजात पारदर्शकता, सुरक्षितता आणि अचूकता वाढविण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, क्षेत्रीय (फिल्ड) अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ‘बॉडी वेअरेबल कॅमेरे’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रस्ते वाहतूक अंमलबजावणी, वाहन तपासणी, वाहनचालकांशी होणारा संवाद तसेच परिवहन कार्यालयातील विविध तपासण्या आणि चाचण्यांचे कामकाज अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह होणार आहे.
29 Sep 2026 01:05 PM (IST)
पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या विचित्र लष्करी प्रशिक्षण पद्धती आणि मैदानातील खराब क्षेत्ररक्षणाच्या कथा नेहमीच समोर येतात, पण आता पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाचा एक अतिशय विचित्र आणि मजेशीर सरावाचा व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रशिक्षण पद्धतींवर टीका केल्याशिवाय राहू शकले नाहीत.
29 Sep 2026 12:48 PM (IST)
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची (SIR) प्रक्रिया आणि कथित ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावरून काँग्रेसने सोमवारी पुण्यात आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. SIR प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच मतदार यादीतील कथित अनियमितता आणि ‘वोट चोरी’च्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
29 Sep 2026 12:36 PM (IST)
चाकणमधील वाहतूक कोंडी, पावसाळी पाणी निचरा, रस्ते आणि नागरी सुविधांच्या विकासासाठी १,४०० कोटी रुपयांच्या, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६.५४ कोटी रुपयांच्या एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली. डिसेंबरपासून कामे सुरू करण्याचे नियोजन असून, पुढील पावसाळ्यापूर्वी चाकणमधील वाहतूक व पाणी निचऱ्याच्या समस्यांमध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि अन्य यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
29 Sep 2026 12:24 PM (IST)
अल्पवयीन मैत्रिणीला लॉजवर नेत तिथे तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर ते फोटो समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी जवळील व्हिक्टरी इन इव्हिनिंग मध्ये घटना घडली आहे. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पियुष रामराव राऊत (वय २१. रा.अन्सारी मार्ग, हडपसर, पुणे) असे गुन्हा नोंदवण्यात आल्याचे नाव आहे.
29 Sep 2026 12:12 PM (IST)
सख्ख्या बहिणीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आणि नंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार शर्मा यांनी हा निकाल दिला आहे. किरकोळ वादातून अन् मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केले होते. सुबोजीत साधन बासू (वय ४३, रा. अपराजिता सोसायटी, बावधन, मूळ रा. कोलकाता) असे दोषी ठरवण्यात आलेल्या भावाचे नाव आहे.
29 Sep 2026 11:50 AM (IST)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात उभारण्यात आला. दिवे-अंजुर गावाजवळ नाशिक महामागाँवर उभारण्यात आलेल्या या पुलाची लांबी १०० मीटर असून, त्याचे वजन तब्बल १,४०५ मेट्रिक टन आहे. महामार्गावरील वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रात्रीच्या वाहतूक बंदच्या कालावधीत हे काम करण्यात आले.
29 Sep 2026 11:45 AM (IST)
टेक कंपनी नथिंगने Nothing Phone (4a) आणि Phone (4b) चे नवीन बेस व्हेरिअंट लाँच केले आहे. कंपनीने यावर्षीच्या सुरुवातीला नथिंग फोन (4a) सीरीज लाँच केली होती. यानंतर, कंपनीने एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये नथिंग फोन (4b) लाँच केला होता. आता कंपनीने नथिंग फोन (4a) आणि नथिंग फोन (4b) चे नवीन बजेट फ्रेंडली व्हेरिअंट्स लाँच केले आहे. यापूर्वी या दोन स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंटमध्ये 8जीबी रॅम मिळाली होती. आता कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स 6 जीबी रॅमसह लाँच केले आहेत.
29 Sep 2026 11:35 AM (IST)
दुष्काळ जाहीर करताना लावलेले सगळे निकष हे सदोष आहेत. कुठले ब्रिटीश कालीन कायदे आहेत. कुठला ट्रिगर, हे सगळे दोष असणारी यंत्रणा आहे, अशी टीका संजय पाटील यांनी केली. शेतकऱ्यांचे अश्रू बघा, त्यांचा आक्रोश बघा, तोच निकष लावून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, अशीही मागणी त्यांनी केली. सरकारने ऐकले नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, अशाही इशारा त्यांनी दिला.
29 Sep 2026 11:25 AM (IST)
सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु हा कोरडा दुष्काळ सरकारने कागदोपत्री जाहीर केला असून शेतकऱ्यांना अजून कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे सेना पक्ष आक्रमक झाला आहे. नांदेडच्या देगलूर तहसील कार्यालयासमोर सरकारने काढलेल्या जीआरची होळी करून शिवसेना ठाकरे सेना पक्षाने आंदोलन केले.
29 Sep 2026 11:20 AM (IST)
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगरसह बोदवड तालुक्यात केलेल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला आता राजकीय वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी 'एक आरोपी तुमच्यासोबत फिरताना दिसत आहे, जरा लक्ष द्या,' असे सांगून 'हितचिंतक म्हणून केलेल्या सूचनेने मन दुखावले तर आश्चर्य वाटते,' अशी भूमिका 'एक्स'वरील पोस्टद्वारे आता मांडली आहे. विशेष म्हणजे कथित आरोपी शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याचा नवीन आरोप त्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
29 Sep 2026 11:15 AM (IST)
जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल किंवा टेक्निकल क्षेत्रात अनुभव असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) विविध नॉन-टीचिंग पदांवर भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेच्या माध्यमातून असिस्टंट डायरेक्टर, टेक्निकल मॅनेजर आणि टेक्निकल असिस्टंट यांसारख्या तांत्रिक पदांच्या एकूण १४ जागा भरल्या जाणार आहेत.
29 Sep 2026 11:05 AM (IST)
लातूरमधून ढोंगी बाबाचे आणखी एक प्रकरण समोर येत आहे. नाशिकमधील खरात प्रकरण शांत झाल्यांनतर आता पुन्हा नव्या ढोंगी बाबाची काळी बाजू समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ढोंगी बाबने किशोरवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले ज्यात ती गरोदर झाल्याचे समोर आले. सांगितले जात आहे की, ढोंगी बाबाने कुंडलीतील दोष करण्याच्या आणि पूजा करण्याच्या बहाण्याने मुलीवर बलात्कार केला. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहचले असून आरोपी बाबाला अटक करण्यात आली आहे.
29 Sep 2026 10:55 AM (IST)
आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. हा सामना १ ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. भारतीय संघाने अव्वल चारमध्ये स्थान मिळवल्याबरोबरच श्रीलंका उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धांवर खराब हवामानाचा परिणाम होत आहे. आज सकाळी ५:३० वाजता होणारा श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातील तिसरा उपांत्यपूर्व सामना सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला आणि श्रीलंकेने त्यांच्या श्रेष्ठ मानांकनाच्या आधारावर उपांत्य फेरीतील स्थान मिळवले.
29 Sep 2026 10:40 AM (IST)
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधी तिवारीच्या मृत्यूनंतर तिच्या आई हेमलता तिवारी यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. निधीचे सोनू सिंह नावाच्या व्यक्तीसोबत संबंध होते आणि त्याच्याकडून तिच्यावर सतत लक्ष ठेवले जात असल्याचा दावा आईने केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलीस त्यांची पडताळणी करीत आहेत.
29 Sep 2026 10:30 AM (IST)
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने होम मार्केट चीनमध्ये मॅजिक 9 सिरीजमधील तीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने या सिरीजअंतर्गत चीनमध्ये Honor Magic 9, Magic 9 Pro Max आणि Magic 9 Super Edition हे तीन स्मार्टफोन्स केले आहेत. या सिरीजमधील मॅजिक 9 सुपर एडिशनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.
29 Sep 2026 10:20 AM (IST)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, नामनिर्देशन अर्जांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. २५ सप्टेंबर रोजी २०२ अर्जांची विक्री झाली होती. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी आणखी १५५ अर्जांची विक्री झाल्याने आतापर्यंत एकूण ३५७ अर्जांची विक्री झाली आहे.
29 Sep 2026 10:10 AM (IST)
Baramati Double Murder: पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी माजी सरपंच इंदुबाई मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) या दोन्ही महिलांची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही वृद्ध महिला रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर झोपलेल्या असताना अज्ञात इसमांनी अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये अतिरक्तस्रावामुळे दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडामुळे बारामती तालुका आणि संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
29 Sep 2026 10:00 AM (IST)
Disha Salian Case Controversy: दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाला खतपाणी घालण्यासह फंडिंग पुरवल्याचा थेट आरोप राणे कुटुंबावर केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मच्छिमारांच्या प्रलंबित नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. नितेश राणे हे मत्स्यव्यवसाय विभागाचे स्वतःचे काम सोडून भलत्याच मुद्द्यांमध्ये गुरफटले असल्याचा गंभीर आरोप चित्रे यांनी केल्यामुळे दोन्ही पक्षांतील शाब्दिक युद्ध अधिक रंगले आहे.
29 Sep 2026 09:55 AM (IST)
Sayaji Shinde On Forest Department: प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी 'सह्याद्री देवराई फाऊंडेशन'च्या माध्यमातून वृक्षारोपण करताना वन विभागाकडून लावल्या जाणाऱ्या नियम आणि कायद्याच्या अटींवर उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्यानंतर आता पूर्व विदर्भात देवराई उभारण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला असून, नागपूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी यासाठी फाऊंडेशनसोबत काम करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, संबंधित जागा राखीव वनक्षेत्र (Reserved Forest) असल्याचे कारण पुढे करत वन विभागाने तेथे वृक्षारोपणास परवानगी नाकारल्यामुळे सयाजी शिंदे यांनी प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.
29 Sep 2026 09:46 AM (IST)
TMC Party Crisis: पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत असून, पक्षाच्या १०० हून अधिक महत्त्वाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यात आगामी दोन मोठ्या जागांवर पोटनिवडणूक पार पडणार असतानाच ही मोठी फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याआधीच आमदारांच्या फुटीमुळे पक्षाचे मूळ नाव आणि 'तृणमूल काँग्रेस' हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले (Freeze) असल्यामुळे ममता बॅनर्जी गटापुढील अडचणी अधिकच गडद झाल्या आहेत.
29 Sep 2026 09:45 AM (IST)
Maharashtra Drought And Rain Forecast: जुलै महिन्यातील एका चांगल्या टप्प्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे आणि 'एल निनो'च्या प्रभावामुळे राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे. केवळ चालू वर्षातच नव्हे, तर आगामी २०२७ मध्येही एल निनो अधिक सक्रिय राहून पाण्याचा आणि पिकांचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत मिळत असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा मोठा अंदाज वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुनरागमन करणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या राज्यातील जनतेला व शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
29 Sep 2026 09:37 AM (IST)
Jio-BP Diesel Limit: खाजगी क्षेत्रातील जिओ-बीपी (Jio-BP) पेट्रोल पंपांवर प्रति ग्राहक दररोज ५० लिटर, तर नायरा एनर्जीच्या आउटलेट्सवर ७० ते २०० लिटरपर्यंत डिझेल विक्रीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, आगामी काळात इंडियन ऑइल (IOCL), बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) या सरकारी इंधन कंपन्यादेखील अशाच प्रकारचे विक्रीवर निर्बंध लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोठ्या व्यावसायिक वाहनांकडून होणारी अतिरिक्त खरेदी रोखून सामान्य वाहनचालकांसाठी पेट्रोल पंपांवर पुरेसे डिझेल सतत उपलब्ध राहावे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
29 Sep 2026 09:35 AM (IST)
FDA Action Under Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐन सणासुदीच्या काळात राज्यभरात अन्न भेसळीविरोधात जोरदार कारवाईचा धडाका सुरू आहे. गणेशोत्सव आणि गौराईच्या काळात एफडीएने गणेश मंडळांना दिलेल्या इशाऱ्यानंतर केलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ३० दुकान व आस्थापनांचे परवाने निलंबित केले असून, १ कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचा ५० टन भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. सार्वजनिक महाप्रसादाच्या भंडाऱ्यांबाबतही कठोर नियमावली जाहीर करत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर थेट कारवाई केल्यामुळे तुकाराम मुंढे आणि एफडीए प्रशासनाच्या या धाडसी कामगिरीचे राज्यभरातून मोठे कौतुक केले जात आहे.
29 Sep 2026 09:26 AM (IST)
Deepak Chahar Stolen Bats: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याच्या अत्यंत खास आणि महागड्या तीन बॅट (Beast Black Bear Edition) एका मैदानातून थेट चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याची बॅट हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो, त्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दीपक चाहरने स्वतः सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ शेअर करून आपल्या या महागड्या बॅट चोरीला गेल्याची माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. या बॅट नेमक्या कोणत्या मैदानातून चोरीला गेल्या याबाबत अजून स्पष्टता आलेली नसली, तरी या घटनेमुळे क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.






