कर्जत/ संतोष पेरणे : माथेरान शहरातील नागरिकांना शासन स्तरावर अतिरिक्त कर माफ करण्यात आले आहे. असं असून देखील या नागरिकांना दंडातून वगळण्यात आलेलं नाही त्यामुळे या नागरिकांना दंड माफ करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन माथेरान भाजप कडून देण्यात आले.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत आपण राज्याचे महसूल मंत्री यांना भेटून तुमचा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले.
माथेरान शहरात मालमत्ता धारकांना दंडातून करवाढ लावण्यात आली आहे. या करवाढीमुळे माथेरान शहरातील मालमत्ता धारक आणि नागरिक यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.त्यामुळे माथेरान शहरातील नागरिक यांना लावण्यात आलेली करवाढ आणि दंडातून माफी मिळावी यासाठी माथेरान भाजपचे शिष्टमंडळ पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भेटीसाठी पोहचले होते.दंड कमी करून मिळावी यासाठी येथील भाजप पदाधिकारी चंद्रकांत जाधव,शहर सचिव राजेश चौधरी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिले.
पनवेलमधील कारदात्यांचा दंड माफ झालं त्या धर्तीवर माथेरान शहराच्या कारदात्यांची शास्ती माफ करावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.माथेरान शहरातील नागरिकांना शासनाच्या अभय योजने अंतर्गत येथील करदात्यांची शास्ती माफ करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.माथेरान मधील करवाढ आणि शास्तुबाबत सविस्तर माहिती घेऊन मुख्याधिकाऱ्यांना अंमलबजावणी करता येईल आणि आवश्यकता वाटल्यास राज्याचे महसूल मंत्री यांना देखील भेटून सकारात्मक चर्चा केली जाईल असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.