भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्थानकात गोळीबार झाल्यामुळे सगळीकडे त्याचबरोबर राजकारणात तुफान चर्चा सुरु झाली आहे. उल्हासनगमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे.
नुकतेच उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्ये हे पोलीस स्टेशनमध्ये बसून होते आणि आमदार गणपत गायकवाड हे हातामध्ये बंदूक घेऊन आले आणि त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे.
महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे.