ठाणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) आज साजरा होत आहे. मनसेचा हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची जाहीरसभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मनसेचा मेळावा साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षाला 17 वर्षे झाल्यानंतर आज मनसे कुठंय असा प्रश्न विचारला जातोय. पण यापूर्वी ज्या पक्षाने 60-65 वर्षे सत्ता भोगली त्यांची अवस्था काय झाली हे पाहा. निसर्गाचा नियम असतो, भरती-ओहोटी सुरु असते. ही गोष्ट भाजपने लक्षात घेतली पाहिले. भरती येत असते, ओहोटीही येईल. काँग्रेसची आजची अवस्था बघा काय झाली आहे? राज्यात भाजपला कोणीही पत्रकार प्रश्न विचारला तयार नाही. टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं? हे एकसुद्धा पत्रकार प्रश्न विचारत नाही. मी कधी एकही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही, असे ते म्हणाले.
तसेच नाशिकमध्ये भ्रष्टाचारविरहित काम केले. लोकं सांगत आहेत नाशिककर आता हळहळले आहेत. पण निवडणुकांत त्यांची हळहळ कुठं गेली होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांना नेमकं काय हवंय हे कधी-कधी समजत नाही. आम्ही करूनदेखील आम्हालाच प्रश्न विचारला जात आहे. मनसेमुळं मोबाईलवर मराठी ऐकायला मिळालं. मराठी चित्रपटांना मल्टिफ्लेक्समध्ये मनसेनं स्क्रीन मिळवून दिली. मराठी पाट्यांचा प्रश्न मनसेमुळं सुटला आहे. रेल्वे भरती मनसेमुळं समजली.
यावेळी मनसेकडून त्यांनी केलेले आंदोलनं, मोर्चे याबाबतचे व्हिडिओ आणि त्याची माहितीही देण्यात आली. त्यामध्ये मराठी पाट्यांचा प्रश्न, पाकिस्तानी नागरिकांना पळवून लावण्याचा विषय असो किंवा मशिदीवरील भोग्यांचा विषय या सर्वांबाबतही त्यांनी भाष्य केले.