सिंधुदुर्गातही मॉक ड्रिल होणार ! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 16 ठिकाणी ही ड्रिल बुधवार, ७ मे रोजी होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्या दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल आणि रात्री 8 वाजता 15 मिनिटांचा ब्लॅकआऊट होणार आहे. यामध्ये आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपदा मित्र, नागरी संरक्षण दल यांचा सहभाग असणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.
‘या’ कारणामुळे खारेपाटमधील 28 गावातील शेतकऱ्यांचा 15 मे रोजी आक्रोश मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले की, ही मॉक ड्रिल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार घेण्यात येत आहे. सायरनद्वारे इशारा देण्यात येईल. सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. ४:१८ वाजता 1 मिनिटांसाठी सायरन वाजवून ड्रिल संपवण्यात येईल. मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, सावंतवाडी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण येथे सायरनची व्यवस्था आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायती व बँकांमधून सायरन वाजवले जातील.
रात्री ८ ते ८:१५ दरम्यान देवगड, वेंगुर्ला व मालवण सागरी भागात ब्लॅकआऊट होणार आहे. या काळात घरातील दिवे, वाहनांचे हेडलाईट्स यांचा वापर टाळावा. प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
वरच्या मजल्यावर असल्यास तळमजल्यावर जा.
घरात असताना कोपऱ्यात सुरक्षित राहा.
उघड्यावर असाल तर जमिनीवर झोपा, कानात बोटं घाला, तोंडात रुमाल ठेवा.
कार्यालय, शाळा याठिकाणी टेबलखाली लपावे.
गाडी चालवत असाल तर रस्त्याच्या कडेला थांबा.
रेल्वेने प्रवास करताना जागेवर बसून राहा.
Mock Drill: ‘उद्या चार वाजता भोंगे वाजणार पण,…’; जिल्हाधिकाऱ्यांचे पुणेकरांना आवाहन
मोकळ्या मैदानात उभं राहू नये.
आग लागल्यास इमारतीवरून उडी मारू नये.
प्रकाशबंदीच्या काळात वीज वापर टाळावा.
अफवांवर विश्वास ठेवू नये.
प्राणी मोकळे सोडू नयेत.
युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन आणि नागरिकांनी कसे वागावे याचा सराव म्हणजे मॉक ड्रिल. यामध्ये अलार्म, आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन सेवा यांचा एकत्रित सराव करून परिस्थिती हाताळण्याची पूर्वतयारी केली जाते.