सहलीच्या हंगामाने एसटीला सोन्याचे दिवस (फोटो- सोशल मीडिया)
यंदाच्या वर्षी एसटीला सहलीच्या हंगामाने तारले
जिल्ह्यात २०१ बसचे बुकिंग; ३७५ एसटी बस सहलीसाठी उपलब्ध
शालेय सहलीला ५० टक्क्यांची मिळाली सवलत
गुहागर: शालेय विद्यार्थ्यांस्वठी वर्षाअखेर म्हणजे सहलीच हंगाम. या हंगामात जिल्ह्यातील एसटी बसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात झालेल्या सर्वाधिक सहलीच्या आरक्षणामध्ये रत्नागिरी जिल्हा तिसरा आहे. तब्बल २०१ एसटी बसेसचे या वेळी बुकिंग झाले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यंदा शालेय सहलींना नवीन गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. तसेच एसटीच्या गाड्यांव्यतिरिक्त खासगी ट्रॅव्हल्स किंवा बसेस वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. परिवहन मंत्रालयाच्या आदेशाचा एसटी महामंडळाला चांगलाच फायदा झाला. त्याचा सकारात्मक परिणाम शालेय सहलीवर झाला.
यंदाच्या वर्षी एसटीला सहलीच्या हंगामाने तारले
डिसेंबर व जानेवारी महिन्यातदेखील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी नव्या गाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे, त्यामुळे यंदा एसटीला सहलीच्या हंगामाने चांगलेच तारले आहे.
‘लालपरी’च्या थांब्याचे वाजले तीनतेरा! निधीअभावी बसस्टँडचे काम ठप्प; प्रवाशांचा संताप
८८ जिल्हातील शाळांकडून एसटी बसना चांगला प्रतिसाद लाभत आहे. दरदिवशी १० ते १५ एसटीच्या बस आरक्षित होत आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे नवीन गाड्या सहलीसाठी देण्यात येत आहेत. एसटीचाच सहलीसाठी वापर व्हावा यासाठी शाळांच्या भेटी घेण्यात येणार आहे जेणेकरून सुरक्षित प्रवास विद्यार्थ्यांना करता येईल.
– प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग
एसटीच्या माध्यमातून शालेय सहलीला ५० टक्क्यांची मिळाली सवलत
सांगली विभागाने २११ आणि रत्नागिरी विभागाने २०१ गाड्यांचे आरक्षण करत चांगली कामगिरी केली आहे.
यातून महामंडळाला १० कोटी ८५ लाखाचा महसूल प्राप्त झाला.
एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला ५० टक्के सवलत दिली आहे.
एसटीच्या ३१ विभागापैकी कोल्हापूर विभागाने ३७५ एसटी बस शालेय सहलीसाठी उपलब्ध करून देऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत १ कोटी ७७ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.






