Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात 'मिसिंग लिंक'ला फटका; बोगद्याच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळल्याने वाहतूक ठप्प
Mumbai-Pune Missing Link : मोठ्या गाजावाजात उभारण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाला पहिल्याच जोरदार पावसाचा फटका बसल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच या मार्गावर खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आज (6 जुलै) पहाटे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळील स्लॅबचा काही भाग कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळील स्लॅब कोसळून डोंगरावरील माती आणि पाण्याचा मोठा लोंढा बोगद्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरला. पाणी आणि मातीचा छतावरून माती आणि पाणी थेट रस्त्यावर कोसळू लागला. अशा परिस्थितीत सुरक्षिततेच्या कारणास्तव मिसिंग लिंकवरील वाहतूक तातडीने बंद करण्याच्या निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची
दरम्यान, मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना नव्या तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक बंद झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, लोणावळा घाट परिसरात गेल्या चार तासांपासून तीव्र वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक वाहनचालक महामार्गावर अडकून पडल्याचेही बोलले जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही तासांत लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीपेक्षा अनेक पटींनी अधिक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे डोंगरकड्यांवरून माती वाहून येण्याच्या घटना वाढल्या असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळी पाहणी सुरू असून, मलबा हटवून मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Rain Updates: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; कुठे दरड कोसळली, कुठे पाणी साचलं? एका क्लिकवर जा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मिसिंगवरील दरड कोसळ्याप्रकरणी थेट राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ” मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का?
मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार! ” अशा शब्दांत रोहित पवारांनी राज्य सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहे.






