वाशिममध्ये बनावट नोटा छापणाऱ्या चौघांना अटक (फोटो सौजन्य - pinterest)
वाशिमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगरुळपीर पोलिसांनी आरोपींकडून बनावट नोटा छापण्याचे साहित्य देखील जप्त केले आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे ही घटना घडली आहे. सर्व आरोपी नांदेड येथून कारमधून येत होते. यावेळी मंगरुळपीर पोलिसांनी नाकाबंदी करत गाडीमधील तिन आरोपींना अटक केली आहे. तसेच सर्व साहित्य देखील जप्त केलं आहे. आरोपी 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. तर उर्वरित एका ओरापीला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- नगर-बीड-परळी रेल्वे नगरहून मराठवाड्यात धावली; 120 किलोमीटर रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड येथून बनावट नोटांचा व्यवसाय करणारे तिघेजण कारमधून येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली आणि सर्व गाड्यांची तपासणी सुरु करण्यात आली. यावेळी एक गाडी समोरून येत होती, त्या गाडीला अडवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला परंतु गाडी थांबली नाही. यानंतर पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर आरोपींनी गाडीचा वेग वाढवला आणि पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. काही अंतर पार केल्यानंतर मंगरुळपीर पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली.
यावेळी पोलिसांना कारमधून एका मोठ्या पिशवीत कागदाचे काही बंडल आणि द्रव असे पदार्थ आढळून आले. ज्याचा वापर खोट्या नोटा तयार करण्यासाठी केला जातो. यानंतर तिन्ही आरोपींना मंगरुळपीर पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत हे तिन्ही आरोपी एक लाख रुपयांच्या बनावट नोटा बनवण्याचे साहित्य खरेदी करत असल्याचे समोर आलं. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम बॅगेबाबत अस्पष्ट उत्तरे दिली.
हेदेखील वाचा-सोमवारी अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली, शाळांना सुट्टी जाहीर
पोलिसांनी कडक कारवाई केली असता त्यांनी नांदेड येथील नसरुल्ला खान उर्फ हाजी साहेब नावाच्या व्यक्तीकडून 1 लाख रुपये देऊन 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवण्याचे साहित्य खरेदी केल्याचं सांगितलं. हेच साहित्य आरोपी गाडीमधून घेऊन जात होते, यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर चौथ्या आरोपीला मंगरुळपीर पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे. चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.
बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये बनावट नोटा डिपॉझिट केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये 3 हजार 200 रूपयांच्या नोटा डिपॉझिट केल्या होत्या. 100 रूपयांच्या 9 नोटा, 200 रूपयांच्या च्या 9 नोटा व 500 रूपयाची एक नोट यांचा समावेश आहे. या नोटा बँकेने नाशिक येथे तपासणीसाठी पाठविल्या असत्या त्या बनावट असल्याचे आढळले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.