Mumbai News: आयआयटी प्रकाशित करणार मुंबई लोकलवरील अहवाल, अनेक महत्त्वाच्या बाबींनी वेधलं लक्ष
Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरुन दररोज सुमारे ६८ ते ७० लाख प्रवासी प्रवास करतात. लोकल मुंबईकरांची लाईफलाईन आहे. वेगवान, किफायतशीर प्रवासाकरिता लोकलला पहिली पसंती आहे. सकाळी-संध्याकाळच्या पीक अवरच्या वेळी लोकलला प्रचंड गर्दी असते. गर्दीमुळे लोकलमधून पडून आणि रुळ ओलांडताना होणाऱ्या मूत्युची संख्या जास्त आहे. त्यातच लोकलच्या तिकिटात गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नाही. तिकिट जास्त असल्याने सामान्य प्रवासी आजही एसी लोकलने प्रवास करत नाहीत.
लोकलचा एकुणच अभ्यास करण्याचे काम मुंबई रेल्वे विरास महामंडळाने (एमआरव्हीसी) आयआयटी मुंबईला दिले. महामुंबईतील रेल्वे मार्गाचा विस्तार करणे, नवे रेल्वे मार्ग उभारणे, रेल्वे प्रकल्पांना अर्थपुरवठा करणे अशी मुख्य जबाबदारी एमआरव्हीसीची आहे, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात टप्याटप्याने सर्व लोकल एसी होत आहेत. एसी लोकलची खरेदी, गाड्या, चालवण्याचा खर्च, प्रवासी उत्पन्न यांच्या विश्लेषणाच्या माध्यमाने व्यवहार्य आर्थिक मॉडेल तयार करण्यात येत आहे. रेल्वे, मेट्रो, बेस्ट अशा सर्व सार्वजनिक वाहतूकीसाठी महामुंबईत एकात्मिक तिकीट प्रणाली राबवण्यात येत आहे. त्याच्या व्यवहार्यता तपासणीचे काम अहवालात केले आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
भविष्यात सुरू होणाऱ्या मेट्रो आणि लोकलच्या विस्तारानंतर प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळवण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीचे टप्पे, आवश्यकतेनुसार वेळापत्रकात बदल, पायाभूत सुविधाची उभारणीच्या कालबद्ध शिफारसी आयआयटी एमआरव्हीसीला करणार आहे.






