‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक
‘काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्व समतानगर येथील वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर एका धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग लागली. अचानक आग लागल्याने प्रवाश्यांमध्ये खळबळ उडाली. बसमधील प्रवासी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले आणि लगेच बसमधून बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने प्रवाश्यांचा जीव वाचला. बसला आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
कारण अद्याप समोर आलेलं नाही
मात्र आग कश्यामुळे लागली, आग लागल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. आता अग्निशमन दलाचे अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत असल्याचे सांगितलं जात आहे. बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
हवामान बदलणार! राज्यात थंडीचा जोर कमी, कसा होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर अपडेट
मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बोचरी थंडी ही सामान्य बाब असली तरीही मुंबईकरांना मात्र या थंडीचा अनुभव क्वचितच येतो, परंतु, रविवारी रात्रीपासूनच मुंबईचा पारा कमालीचा घसरल्यामुळे मुंबईकरांनीही बोचरी थंडीचा अनुभव घेतला. रविवारी रात्री कुलाबा येथे किमान १९ तर सांताक्रुझ येथे १५.९ अंश तापमानाची नोंद झाली, जे की या मोसमातील निच्चांकी तापमान ठरले. कुलाबा येथे २८.० अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा २.१ अंश सेल्सिअसने कमी होते. तर सांताक्रूझ येथे २७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंश सेल्सिअसने कमी होते. किमान आणि कमाल तापमानाच्या एकत्रित नीचांकी नोंदीमुळे मुंबईतील थंडी बोचरी ठरली.
Ans: कांदिवली पूर्व समतानगर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ही घटना घडली.
Ans: नाही, सर्व प्रवाशांनी वेळीच बसमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
Ans: आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.






