'या' स्थानकात लोकल थांबणार नाही! रविवार मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
Mumbai Local Train Mega Block News Marathi : मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांमध्ये रविवारी (18 जानेवारी 2026) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे केली जाणार असून, काही लोकल सेवांमध्ये बदल आणि रद्दीकरण होणार आहे.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
स्थानक: सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग: अप आणि डाउन स्लो
वेळ: सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५
परिणाम: ब्लॉक काळात, अप आणि डाउन स्लो मार्गांवरील लोकल अप आणि डाउन जलद मार्गांवर वळवल्या जातील. यामुळे, काही लोकल गाड्या रद्द केल्या जातील तर काही २० मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉक कालावधीत लोकल सेवा मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवर उपलब्ध नसेल. जलद मार्गासाठी फलाट नसल्याने एरवी या स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ब्लॉक कालावधीत पर्यायी वाहनाने प्रवास करावा लागेल.
हार्बर मार्ग
स्थानक: पनवेल ते वाशी (पोर्ट मार्गिकावगळून)
मार्ग: अप आणि डाउन
वेळ: सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५
परिणाम: ब्लॉक काळात, सीएसएमटी आणि पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान अप आणि डाउन लोकल गाड्या रद्द केल्या जातील. सीएसएमटी आणि वाशी आणि ठाणे ते वाशी नेरुळ दरम्यान विशेष अप आणि डाउन लोकल गाड्या चालवल्या जातील. उरण मार्गावर गाड्या उपलब्ध असतील.
पनवेल ते ठाणे या ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ दरम्यान रद्द करण्यात येतील. तसेच, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान रद्द करण्यात येईल. ब्लॉक काळात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशी स्टेशन दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे – वाशी / नेरुळ स्टेशन दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर लोकल उपलब्ध असतील. ब्लॉक काळात बेलापूर / नेरुळ आणि उरण स्टेशन दरम्यान बंदर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असेल.
ब्रिटीश काळात बांधलेला पूल क्रमांक ५ हा जुने आहेत. जुने गर्डर काढून त्या जागी नवीन गर्डर बसवले जातील. यामुळे ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल दरम्यान १३ तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान, अप आणि डाऊन स्लो मार्गावरील लोकल गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गांवर वळवल्या जातील. प्रभादेवी येथील रेल्वे उड्डाणपूल पाडण्यासाठी डाउन स्लो मार्गावर साडेसात तासांचा ब्लॉक घेतला जाईल, तर पुलाचे गर्डर पुन्हा बांधले जात आहेत.






