बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर गोळीबाराचा थरार; परिसरात तणावाचं वातावरण
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोरच मुख्य रस्त्यावर दोन गटांमध्ये वादातून हा गोळीबार झाल्य़ाची माहिती आहे. या गोळीबारात अल्ताफ शेख नावाचा युवक जखमी झाला असून त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.
Pune Crime News: कुरियर बॉय असल्याचं भासवलं अन्…; कोंढव्यात उच्चभ्रू सोसायटीत २५ वर्षीय तरुणीवर…
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बदलापूरमधील बोरटपाडा–मुरबाड मार्गावर हा गोळीबार झाला. या ठिकाणी आमदार कथोरे यांचं निवासस्थान आहे, त्याच रस्त्यावर ही घटना घडल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मते, जखमी अल्ताफ शेख याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि ही घटना जुन्या वैरातून घडली असण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बदलापूरमधील काही स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे एखादी गुन्हेगटाची सुपारी असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपासाला सुरू केला आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू असून लवकरच दोषींना अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी शिवसेना नेते मोहन राऊत यांची देखील बदलापूरमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. अलीकडेच त्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
धक्कादायक! जबरदस्तीने मित्राला लिंगबदल करण्यास भाग पाडून बलात्कार, १० लाख दिले नाही तर आयुष्य…..
सध्या बदलापूर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.