पडद्यामागील हालचालींना वेग! कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु, महापौर नेमका कोणाचा होणार?
Raigad News: कर्जत-खालापूरात राजकीय उलथापालथ! परिवर्तन आघाडीने मारली बाजी, अजित पवार–ठाकरे गट एकत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यामुळे अखेरीस रवींद्र चव्हाण यांना स्वबळाचा आग्रह बाजूला सारत शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करून निवडणूक लढवावी लागली, भाजपामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर केलेल्या युतीमुळे मोठी नाराजी उफाळून आली होती. तथापि, रवींद्र चव्हाण यांनी सर्वांची समजूत काढली. निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने ५४ जागा लढवून घसघशीत तब्बल ५० जागांची कमाई केली. तर, शिंदे याच्या शिवसेनेने भाजपापेक्षा अधिक अशा ६८ जागा लढवल्या तथापि शिंदे सेनेला भाजपापेक्षा केवळ दोनच अधिक जागा म्हणजे ५२ जागांवर विजय मिळवता आला, त्यामुळेच कल्याण-डोंबिवलीत भाजपाचा स्ट्राइक रेट हा शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक आहे. महापौर पदाचा निकष अधिक जागा न धरता स्ट्राईक रेट ठरवावा, असा आता भाजपा नेत्यांचा आग्रह आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कल्याण पूर्वमधून उद्धव ठाकरे याच्या मशाल निशाणीवर निवडणूक लढवून जिंकून आलेले नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत.
६८ शिंदे यांच्या शिवसेनेला कल्याण-डोंबिवलीतील १२२ जागापैकी कल्याण पूर्वेतून निवडून आलेल्या मनसेच्या कल्याण पूर्वेतून निवडून आलेल्या मनसेच्या नगरसेविका शितल मंदारी यांनी भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शितल मंदारी यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तथापि युतीच्या जागावाटपामुळे त्यांना उमेदवारी देणे भाजपला शक्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी मनसे प्रवेश करून मनसेतर्फे निवडणूक लढवली आणि जिंकून आल्या. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेने नगरसेवकांची जमवाजमव सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडून निकाल जाहीर झाला असला तरी अद्याप राज्य सरकारने महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण सोडती द्वारे निश्चित केलेले नाही. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात नगर विकास खात्यातर्फे मंत्रालयात महापौर पदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर आठच दिवसात राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका होणार आहेत.






