".... पैसे घे, जा आणि पोलिसांना सांग मी...", अर्धनग्नावस्थेत मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ (फोटो सौजन्य-X)
MNS Leader Son News In Marathi : मीरा रोड घटनेनंतर आता मुंबई मनसे नेत्याच्या मुलाने दारू पिऊन गाडीला धडक दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. राखी सावंतची माजी मैत्रीण राजश्री मोरे हिने सोशल मीडियावर दावा केला आहे की, मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद शेख यांनी मुंबईतील अंधेरी येथे त्यांच्या गाडीला धडक दिली. याप्रकरणी राजश्री मोरे हिने म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता. इंस्टाग्रामवर राजश्रीने घटनास्थळाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये आरोपीची ओळख मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद शेख अशी झाली आहे. फुटेजमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे, तो आक्रमक दिसत आहे आणि शिवीगाळ करताना ऐकू येते. क्लिपमध्ये एका ठिकाणी तो ‘माझे वडील मनसेचे राज्य उपाध्यक्ष आहेत’असं बोलताना दिसत आहे.
राजश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मनसे नेत्याचा मुलगा अर्धनग्न अवस्थेत आहे. तो राजश्रीला शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय. …. पैसे घे. जा आणि पोलिसांना सांग मी जावेद शेखचा मुलगा आहे… मग काय होईल ते दिसेल अशा शब्दात राहिल शेख धमकी देताना दिसतो. या घटनेनंतर राजश्रीने राहिल जावेद शेखविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरचा फोटो शेअर केला.
तिने पुढे आरोप केला की स्थानिक मराठी समुदायाबद्दलच्या तिच्या अलिकडच्या टिप्पण्या आणि मराठी भाषा लादण्याबाबत सुरू असलेल्या वादामुळे तिला मनसे कार्यकर्ते आणि समर्थकांकडून लक्ष्य केले जात आहे. राजश्रीने राहिलविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राहिल खान हा घटनास्थळी असणाऱ्या पोलिसांशीसुद्धा वाद घालतो. पोलिसांना सहकार्य न करता त्यांच्याशीही आक्रमक वागतो.
मनसे नेत्याच्या मुलाने नंतर त्याचे कान धरून माफी मागितली. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, राजश्रीने अलीकडेच दावा केला आहे की स्थलांतरितांनी शहर सोडल्यास मुंबईतील स्थानिक मराठी लोकसंख्येची स्थिती आणखी बिकट होईल. तिच्या या वक्तव्यानंतर, वर्सोवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात राजश्री मोरेविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रत्युत्तरात राजश्रीने जाहीरपणे माफी मागितली आणि नंतर वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकला. राजश्री मोरे ही महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती सध्या मुंबईत राहते.