नागपूर : आगामी नागपूर मनपा निवडणुकीसाठी आज महिला आरक्षणाची सोडत शहरतील सुरेशभट सभागृहात काढण्यात आली. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांकरीता आरक्षित वार्ड इश्वरचिट्ठीद्वारे जाहीर करण्यात आले. यंदा चार ऐवजी तीन वार्डांचा प्रभाग असल्याने प्रभाग संख्या ३८ वरुन ५२ वर पोहोचली आहे. तसेच, वार्डांच्या सीमेतही बदल करण्यात आल्याने वार्डांची एकूण संख्या १५१ वरुन १५६ वर पोहोचली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांकरिता
या १६ जागांसाठी असलेल्या सोडतीत प्रभाग क्र २ मधील जागा क्र अ, प्रभाग क्र. १० मधील जागा क्र. क, प्रभाग क्र. ४३ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. १३ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र, २० मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३० मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र २७ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र ३९ मधील जागा क्र. १६, प्रभाग क्र. १६ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३७ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ४५ मधील जाग क्र. अ, प्रभाग क्र. १ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. १४ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३८ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. १५ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ५२ मधील जाग क्र. अ या १६ जागांचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील आरक्षित जागा
अनुसूचित जामाती महिलांकरिता प्रभाग क्र २४ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ११ मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. ३७ मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. १२ मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. ४ मधील जागा क्र. ब आणि प्रभाग क्र. ५१ मधील जाग क्र. ब या जागांचा समावेश आहे.
सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित जागा
इश्वर चिठ्ठीद्वारे सोडविण्यात आलेल्या महिला प्रभागांमध्ये प्रभाग ३१ मधून जागा क्र. ब, प्रभाग २२ मधून जागा क्र. ब, प्रभाग २३ मधून जागा क्र. ब, प्रभाग ४० मधून जागा क्र. ब, प्रभाग ३२ मधून जागा क्र. ब, प्रभाग ४९ मधून जागा क्र. ब, प्रभाग २९ मधून जाग क्र. ब, प्रभाग ३५ मधून जागा क्र. ब, प्रभाग १७ मधून जागा क्र. ब, प्रभाग १७ मधून जागा क्र. ब, प्रभाग ४८ मधून जाग क्र. ब, प्रभाग ६ मधून जागा क्र. ब, प्रभाग २ मधून जागा क्र. ब या जागांचा समावेश आहे.