चंद्रपूर जिल्ह्यात 38221 सिकलसेलचे वाहक, रक्तातून पिढ्यानुपिढ्या संसर्ग
राष्ट्रीय सिकल सेल अनेमिया निर्मूलन मिशन देशभरात राबविलं जातं. हा आजार रक्ताशी संबंधित आहे.सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यात सण 2009-2010 पासून सुरू करण्यात आला. 1 जुलै 2023 ला राष्ट्रीय सिकल सेल अनेमिया निर्मूलन मिशन कार्यक्रमाचे पंतप्रधान यांचे हस्ते उदघाटन करून सदर आजार सण 2047 पर्यंत निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे राष्ट्रीय स्तरावरून संनियंत्रण करण्यात येत आहे. जिल्ह्यात सदर कार्यक्रम सुरू सुरू झाल्यापासून आजपावेतो 21 लाख 14 हजार 453 लाभार्थीची सिकलसेल तपासणी करण्यात आली आहे. त्यात 2946 सिकलसेल ग्रस्त रुग्ण व 38221 सिकल सेल वाहक व्यक्ती आढळलेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे यांनी नवराष्ट्रशी बोलताना बुधवारी (दि.18) दिली.डॉ. कटरे म्हणाले, सिकलसेल या आजाराच्या अंतिम निदानासाठी जिल्ह्यात 6 इलेक्टरोफोरेंसिस सेंटर आहेत. ग्रामीण रुग्णालय, (मूल वरोरा, चिमुर एचपीएलसी)नागभीड, उपजिल्हा राजुरा व जिल्हा रुग्णालय चंद्रपूर तसेच इतर रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एचएलएल व क्रष्णा डायग्नोस्टिक या राज्य शासनामार्फत नियुक्त बाह्यस्त्रोत कंपनी मार्फत एचपीएलसी तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था स्तरावर सिकलसेल तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तपासणीत आढळून आलेले सिकलसेलग्रस्त रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून औषध उपचाराकरिता पाठपुरावा करण्यात येत आहे. सिकलसेल ग्रस्त रुग्णांना मोफत रक्त संक्रमण तसेच सिकलसेल कार्यक्रमासोबतच 123 थायलेसेमिया व 30 हिमोफिलिया
सिकलसेलची लक्षणे
अशक्तपणा, सांधेदुखी, सांधे सुजणे, शरीर पिवळसर होणे, असह्य वेदना होणे, लहान बालकांना वारंवार जंतुसंसर्ग होणे.
अशी केली सिकलसेलची जाते तपासणी
बोटातून एक चैव रक्त घेऊन सोल्यूबिलिटी चाचणी केली जाते. ही चाचणी पॉझिटिव्ह असल्यास हिमोग्लोबीन इलेक्ट्रोफोरेसीस . एच.पी.एल.सी. चाचणी केली जाते. सर्व शासकिय आरोग्य संस्थेत सिकलसेलची मोफत तपासणी केली जाते.
रुग्णांना डे केअर सुविधा उपलब्ध करून दिले, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर तालुक्यात
2009 पासून मार्च 2025 पर्यंत 22043707 लोकांपैकी 2110135 लोकांची सोल्युबिलिटी चाचणी करण्यात आली. या चाचणीत सिकल सेलचे सर्वाधिक 767 रुग्ण चंद्रपूर तालुक्यात आढळून आले. तालुका निहाय प्रगतीपर अहवालानुसार बल्लारपूर येथे 151. गोंडपिपरी 147, पोंभुर्णा 118, मूल 205, सावली 163, सिंदेवाही येथे 139, ब्रहापुरीत 184, नागभिड 272, राजुरा 234, कोरपना 94, विमूर 157, वरोरा येथे 193, भद्रावतीत 107 व जिवती येथे सर्वात कमी 15 सिकलसेल रुग्ण आढळून आले आहेत.
7 तालुक्यात रुग्णांचे प्रमाण अधिक
चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा, नागभीड, मूल, राजुरा, चंद्रपुर, सावली, सिंदेवाही यो 7 तालुक्यात सिकलसेल रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सर्व आरोग्य संस्था स्तरावर हायड्रॉक्सि युरिया औषधघ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
रुग्णांसाठी शासकीय योजना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1000 रु. प्रति महिना. 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेत प्रति तास 20 मिनिटे जास्त मिळतात. मोफत एस.टी. प्रवास (150 कि.मी.), मोफत औषधोपचार एस.बी.टी.सी. कार्ड मार्फत मोफत रक्त उपलब्ध.
लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांच्याही रक्ताची करून घ्यायला हवी. दोघेही वाहक असतील किंवा एक वाहक व एक ग्रस्त असेल असे विवाह टाळायला हवे. दोघेही ग्रस्त असतील तर त्यांच्या होणाऱ्या या अपत्याला हा आजार होऊ शकतो. म्हणून असे विवाह टाळा.
– संतोष चित्रेश्वर, जिल्हा सिकल सेल
समन्वयक, चंद्रपूर