नागपूर : नागपूर येथील त्रिमूर्तीनगरात एक चकित करणारी घटना घडली आहे. चक्क कुत्र्यांच्या भुंकण्याच्या त्रासाला कंटाळून दोन महिलांनी शेजाऱ्या विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मालती (६६) व नलिनी राहगुडे (६८) या दोन वयोवृद्ध अविवाहित महिला राहतात. तर, यांना माईग्रेन आणि अपस्मार या आजारांचा त्रास आहे. तर, धीरज डहाके (Dheeraj Dahake) हे त्यांच्या शेजारी राहतात. त्यांच्याकडे एक जर्मन शेफार्ड (German Shepherd) जातीचा कुत्रा आहे.
[read_also content=”आता खायला मिळणार मनोरुग्णांनी तयार केलेले ब्रेड व टोस्ट, नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/bread-and-toast-prepared-by-psychiatrists-to-be-fed-now-commendable-initiative-of-regional-psychiatric-hospital-nagpur-nraa-246896.html”]
डहाके यांच्याकडील कुत्रा दिवसभर भुंकत असतो. त्यामुळे, आम्हा दोन्ही बहिणींना त्याच्या भुंकण्याचा खूप त्रास होतो. यासाठी त्यांनी सुरुवातीला डहाके कुटुंबीयांना अनेकदा विनंती केली. परंतु, त्यांनी याबाबत कसलीच उपाययोजना केली नाही. त्यानंतर त्यांनी महापालिकेकडे सुद्धा तक्रार केली. पण त्याचाही उपयोग झाला नाही. तर, त्या पोलिसांकडेही दाद मागण्यासाठी गेल्या, तेथेही त्यांच्या तक्रारीचे निवारण झाले नाही. अखेर त्यांना कोर्टाचे दार ठोठावले आहे. आम्ही आजारी आहोत. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे फारच त्रस्त आहोत. तरी, या कुत्र्याचे भुंकणे बंद करा. असे म्हणत त्या उच्च न्यायालयाचा (High Court) गेल्या आहे. याचिकाकर्त्या महिलांच्या वतीने अॅड. शेख सिबघतुल्ला जागीरदार यांनी कामकाज पाहिले.
[read_also content=”हिनाने पटकाविले नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय दौड स्पर्धेत सुवर्णपदक, आतापर्यंत तीन सुवर्ण पदकांची मानकरी https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/hina-wins-gold-at-international-race-in-nepal-three-gold-medalists-so-far-nraa-246747.html”]
कुत्र्याचे भुंकणे थांबविणार तरी कसे ?
मालकाने कुत्र्याला न भुंकण्याचे प्रशिक्षण द्यावे. त्याचे भुंकणे थांबवावे अन्यथा महापालिकेने त्याला ताब्यात घ्यावे, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने या प्रकरणी मनपा प्रशासन, पोलीस आणि पशू संवर्धन विभाग यांना नोटीस बजावली आहे. कुत्रा असल्याने तो भुंकणारच. कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केली असेल किंवा कुणाचा चावा घेतला असेल, तरच कारवाई करता येईल. पण, कुत्र्याचे भूंकणे कसे थांबविणार, असे उत्तर मनपाने दिले आहे.
[read_also content=”युक्रेनमध्ये अडकला वाशिमचा आमलन व्यास परंतु, जिल्हा प्रशासनाकडे मात्र विद्यार्थ्याची नोंदच नाही https://www.navarashtra.com/washim/vidarbha/washim/washims-amlan-vyas-is-stuck-in-ukraine-but-the-district-administration-has-no-record-of-the-student-nraa-246598.html”]
डहाके यांनी फेटाळला आरोप
धीरज डहाकेच्या आई पंचफुला डहाके यांनी न्यायालयात आपले उत्तर सादर केले. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याचिकाकर्त्या महिला या सतत तक्रार करून मानसिक त्रास देतात. आजपर्यंत आमच्याकडील कुत्र्याने कुणालाही दुखापत केलेली नाही. तर, आमच्याकडे कुत्रा पाळण्याचा कायदेशीर परवाना आहे. मालकाने पाळीव कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी मोकळे सोडले तरच, कायद्यानुसार कारवाई करता येते. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती महापालिकेच्यावतीने करण्यात आली. तर, डहाके यांचा कुत्रा हा पेपरवाला, दूधवाला, भाडेकरू, रस्त्यावरून वाहतूक करणार्यांवर भुंकत असतो. भारतीय पशू कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मालकाने कुत्र्याला गप्प ठेवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.