नागपूर : विदर्भात (Vidarbha) गेल्या काही दिवसांपासून वातावरणाचा चढउतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे, तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ आणि नागपूर येथील तापमानात काही अंशाने घटले आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ येथील तापमान ५ तर नागपूरचे तापमान ४ अंशाने खाली आले आहे. यामुळे, पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला आहे. तर, थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.
[read_also content=”मध्यप्रदेशातील वाळू माफियांच्या मदतीने वाळूची तस्करी करणाऱ्यांची टोळी गजाआड https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/with-the-help-of-sand-mafias-in-madhya-pradesh-a-gang-of-sand-smugglers-has-gone-missing-nraa-227688.html”]
या वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीने संपूर्ण वातावरण बिघडले आहे. तर, बदलत्या वातावरणामुळे घराघरांत सर्दी, खोकला व तापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे, आता या वातावरणापासून एकदाची सुटका व्हावी अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. तर, ग्रामीण भागातील लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. तर, शहरी भागात स्वेटर आणि इतर थंडी पासून बचावासाठी कपडे घातलेले लोक दिसत आहेत.
[read_also content=”नागपुरात १७ वर्षांच्या मुलीची गर्भधारणा, आरोपी फरार तर त्या अल्पवयीन मुलीने दिली अशी धमकी…. https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/pregnancy-of-a-17-year-old-girl-in-nagpur-accused-absconding-but-threatened-by-the-minor-girl-227612.html”]
नागपूरचे तापमान ९.८ अंश सेल्सिअस आहे. तर, बुधवारी सर्वाधिक कमी तापमान बुलडाण्यात नोंदविण्यात आले. ९. २ हे विदर्भातील निच्चांकी तापमान होते. त्याखालोखाल नागपुरात ९. ८ अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली आले. यवतमाळमध्ये १०. ५ , गोंदियात १०, अकोल्यात १०.६, तर अमरावतीत १०. ८ अंश सेल्सिअस तापमानाची बुधवारी नोंद झाली आहे. नागपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती आज सर्वाधिक थंड राहणार आहे. त्यानंतर, तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.