नांदेड भाजपमध्ये राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी इच्छुक उमेदवारांना उपदेश दिला (फोटो - सोशल मीडिया)
नांदेड : विधानसभेच्या निवडणुकीत उघड बंडखोरी केलेल्या नेत्याच्या व्यासपीठावर उभे राहून भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी इच्छुक उमेदवारांना “इमानदारी, संयम आणि निष्ठा” यांचे धडे दिले. यावेळी त्यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय व एकात्म मानवतावाद या संकल्पनांवर बौद्धिक मांडणी केली. समाजातील शेवटच्या, दुर्बल, उपेक्षित घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, हा अंत्योदयाचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि मानवता यांचा समतोल विकास साधण्यावर भर देणारी ही संकल्पना केवळ राजकीय नसून मानवतावादी सामाजिक विचारधारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र, या इमानदारीच्या भाषणाला व्यासपीठाची पार्श्वभूमीच छेद देणारी ठरली. पक्षशिस्त मोडणाऱ्यांच्या व्यासपीठावरून निष्ठावंत कार्यकत्यांना संयमाचे उपदेश दिले जात असल्याने भाजपाच्या आजच्या कार्यपद्धतीतील विसंगती ठळकपणे समोर आली, अशी टीका राजकीय वर्तुळात होत आहे. नांदेड वाचाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामध्ये तब्बल १६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र हा कार्यक्रम विकासाचा उत्सव न ठरता, भाजपाच्या बदलत्या, पंचतारांकित आणि विसंगत कार्यशैलीचे प्रदर्शन ठरल्याची चर्चा रंगली आहे.
हे देखील वाचा : भाजपने खेळला मोठा डाव! ‘या’ नेत्यावर सोपवली अध्यक्षपदाची जबाबदारी
दगडालाहा तिकाट दिल तर…
प्रभाग सहामध्ये इच्छुकांची संख्या इतकी मोठी आहे की इथं दगडालाही तिकीट दिलं तरी ती निवडून येईल अशी भाषा खुलेआम वापरण्यात आली. हा आत्मविश्वास की अहंकार, असा प्रश्न उपस्थित झाला. विरोधी पक्षांकडे उमेदवार नाहीत, भाजपाकडे ताकदवान फौज आहे, असे सांगत नाराजांनी पक्षांतर करू नये, अन्यथा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होईल, असा अप्रत्यक्ष इशाराही देण्यात आला. ही भाषा लोकशाहीची की राजकीय दबावाची, असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे.
खासदार गोपछडे यांनी स्वतःचे उदाहरण देत, विधान परिषदेचे तिकीट कापल्यानंतर संयम ठेवल्यामुळे राज्यसभेची संधी मिळाल्याचे सांगितले. मात्र सामान्य कार्यकत्यांसाठी हा संयम किती वर्षाचा व किती अपमानाचा असावा लागतो, याचे उत्तर भाषणात नव्हते, “उमेदवारी नाही मिळाली तरी रवीकृत सदस्यपद देऊ है आश्वासन सतेच्या झगमगाटात हरवलेल्या कार्यकत्यांच्या वेदनांवर फुंकर ठरले की केवळ शब्दफेक, हा प्रश्न कायम राहिला.
हे देखील वाचा : जुनागड’ पाकिस्तानात विलीन करण्याचा डाव? सरदार वल्लभभाई पटेलांनी नवाबाला कु्त्र्यासारखं पळून लावलं
याच कार्यक्रमात महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांनी शहरात भाजपाचा आमदार नसतानाही मोठा निधी आणल्याचा उल्लेख केला, तसेच “एकाच प्रभागात निधी खर्च न करता संपूर्ण शहराकडे पाहा असा सूचक टोलाही लगावला, त्यामुळे एका प्रभागात कोट्यवधीचा निधी ओतला जात असताना इतर प्रभाग उपेक्षित राहिल्याची खदखद उघड झाली.
मेट्रोसारखी स्वप्ने
विकास निधी जनतेव्या करातून येतो, त्यामुळे भूमिपूजन गोरगरीबांच्या हस्ते व्हाये, असे सांगतानाच मेट्रोसारखी मोठी स्वप्ने पाहण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र आजही ड्रेनेजमुळे खट्टचांत अडकलेल्या रस्त्यांवरील नागरिकांसाठी ही स्वप्ने किती वास्तववादी आहेत, यावर प्रश्नचिना आहे. प्रभाग सहामचील हा कार्यक्रम केवळ विकासकामांचा शुभारंभ नव्हता, तर भाजपाच्या बदलत्या कार्यशैलीचा आणि तळागाळातील कार्यकत्यांपासून वाढत चाललेल्या दुराव्याचा आरसा ठरला, व्यासपीठावर इमानदारीचे भाषण गाजले, पण जमिनीवर मात्र नाराजी, अस्वस्थता आणि अंतर्गत संघर्ष अधिकच ठळक झाल्याचे वास्तव समोर आले.






