पंचायत समितीच्या निवडणुकीत सभापती, उपसभापती पदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे (फोटो - सोशल मीडिया)
मानवत : पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवले आहे. (Political News) आठ सदस्यांपैकी तब्बल सहा गणांमध्ये विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे.
आता पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी जोरदार लॉबिंग केली जात असल्याची चर्चा सुरु असल्याने आ. राजेश विटेकर कोणाला संधी देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Nanded News)
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मानोली गणातून ज्योती लक्ष्मण शिंदे, कोल्हा गणातून सर्जेराव हरकळ, ताडबोरगाव गणातून ललिता निर्वळ, पाळोदी गणातून सूरज काकडे, केकरजवळा गणातून प्रमिला रणखांबे आणि मंगरूळ (बु.) गणातून शहानूर पठाण हे सहा उमेदवार विजयी झाले. त्यामुळे पंचायत समितीमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.
हे देखील वाचा : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प
उपसभापतीपदासाठी सूरज काकडे आघाडीवर
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) पक्षालाही दोन जागांवर यश मिळाले आहे. रामपुरी गणातून सरस्वती नाईक तर किन्होळा प्रमिला गणातून उक्कलकर या उमेदवारांनी विजय मिळवला. पंचायत समितीचे सभापतीपद यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला
सदस्यांपैकी एका सदस्याची निवड होणार आहे.
मानोली गणातून विजयी झालेल्या ज्योती शिंदे आणि ताडबोरगाव गणातून निवडून आलेल्या ललिता निर्वळ या दोघींपैकी.
वर्णी एकीची सभापतीपदी लागण्याची दाट शक्यता व्यक्त आहे.
या बाबत आ.राजेश विटेकर आणि बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.
पाळोदी गणातुन विजयी झालेले सूरज काकडे यांची गटनेते पदी नियुक्ती झाली आहे त्यांचची उपसभापतीपदी निवड होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सभापतीपदाचे आश्वासन, मात्र निवडणुकीत पराभव
आता पंचायत समितीतील सभापती व उपसभापती पदासाठी अंतिम निर्णय स्थानिक नेतृत्वाकडून घेतला जाणार आहे.
रामपुरी गणातून निवडणुक लढावणाऱ्या माजी सदस्य गीता शैलेश यादव यांना सभापतीपदाचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र निवडणुकीत त्यांचा अवघ्या ३२ मतांनी पराभव झाला. आता त्यांची संधी हुकल्याने आता विजयी झालेल्या ज्योती शिंदे आणि ललिता निर्वळ दोन महिला सदस्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हे देखील वाचा : तब्बल ४८१ रिक्त पदांमुळे महापालिकेत प्रभारीराज; बिंदू नामावलीचा ठोस आराखडा असणे गरजेचे






