"काहीजण वाघाचे कातडे पांघरलेले कोल्हे"; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान :जनता फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या मागे राहत नाही तर फेस टू फेस काम करणाऱ्यांच्या मागे राहते. कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही. संताजी धनाजी जसे स्वप्नात यायचे तसे मी त्यांच्या स्वप्नात येतो. खरा वाघ कोण हे जनतेने दाखवून दिले आहे. मात्र काहीजण वाघाचे कातडे पांघरलेले कोल्हे आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई एरोलीत केली. ते मेळाव्यात बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, माजी नगरसेविका अनिता मानवतकर, काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे सेनेत प्रवेश केला.
मी डॉक्टर नाही मात्र लहान मोठी ऑपरेशन मी करतो असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सत्तापालट झाल्यावर ३२ देशांनी माझ्याविषयी चर्चा केली. मला कोणी हलक्यातात घेऊ नका मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुमची माणसे सांभाळा, पक्ष का सोडतात ते आत्मचिंतन करा, मग मला शिव्या देण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. लोकसभेला यांनी फेक नरेटीव्ह पसरवले. मात्र शेवटी राज्यातील लाडक्या बहिणींनी विधानसभेला आम्हाला पाठिंबा दिला. लाडक्या पात्र बहिणीनं त्यांचा लाभ मिळत राहील अशी ग्वाही देतो असे शिंदे म्हणाले. राजधानीत महाराष्ट्राप्रमाणे भगवा फडकला. भ्रष्टाचाराचे फडके दिल्लीकरांनी फेकून दिले. महाराष्ट्रातील अनेक कोपऱ्यातून शिवसेनेत प्रवेश होत आहे. प्रवाह करणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. २३ राज्यांमध्ये शिवसेना पसरली आहे असे शिंदे म्हणाले.
जे प्रवेश करतात ते बाळासाहेब आनंदी दिघेंच्या क्विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत. प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत काँग्रेसमध्ये असले तरी ते दिघे व माझ्या जवळचे होते. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला. आम्ही विकासाला चालना दिली. माविआनी बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. लोकाभिमुख योजना आम्ही सुरू केल्या. त्यामुळे आम्हाला दैदिप्यमान यश आम्हाला मिळाले लाडक्या बहिणी पाठीशी उभ्या राहिल्या. मी सीएम म्हणून नाही तर कॉमन मॅन म्हणून काम केले. आता डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून काम करत आहे. हम जहा खडे रहते है वहा सोशल वर्क सुरू होता है असे म्हणत शिंदेंनी अमिताभ यांची डायलॉगबाजी केली.
स्वर्गीय बाळासाहेब सर्वांना सवंगडी, सहकारी समजायचे. मात्र काही लोक कार्यकर्त्यांना घरगडी समजू लागले. त्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली. आपण ८० जागा लढवल्या ६० जिंकल्या, उबाठाने ९७ जागा लढवून २० जागा जिंकल्या. आपला मतदानाचा टक्का वाढला. खरी शिवसेना लोकांनी दाखवली. हा झंझावात पाहता दिल्लीत आपचे १५ उमेदवार माझ्याकडे उमेदवारी मागत होते. मात्र विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून भाजपाला समर्थन देण्यास सांगितले असा खुलासा शिंदेंनी केला.
आम्ही लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला चुनावी जुमाला म्हणून हिणवण्यात आले.बाय विरोधात ते कोर्टात गेले. मात्र लाडक्या बहिणींनी त्यांना जोडा दाखवला. माजी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी कंबरेचे सोडलेले पाहायला मिळाले असे म्हणत ठाकरेंवर शिंदेंनी टीका केली. मी कधी खुर्चीसाठी मी कासावीस नव्हतो. देवेंदजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. मात्र आमच्यात गैरसमज पसरवले जात आहेत. माझ्या रक्ताच्या थेंबावर जनतेचा अधिकार आहे. इतिहासात नोंद होईल इतके, ऐतिहासिक निर्णय घेतले. नवी मुंबईतील भूमिपुत्र वंचित राहणार नाही. पाण्याची गरज देखील शहराची गरज भागवू असे शिंदे म्हणाले.