Ncps Protest For Increase In Subsidy For Gharkul Schemes Nrab
घरकुल योजनांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी राष्ट्रवादीचे दंडवत आंदोलन
शासनाकडून मिळणाऱ्या विविध घरकुल योजनांच्या अनुदानात वाढ व्हावी. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरद पवार गट) बुधवारी (दि.१०) इंदापूर शहरातील बाबा चौक ते पंचायत समिती दरम्यान दंडवत आंदोलन करण्यात आले.
इंदापूर : शासनाकडून मिळणाऱ्या विविध घरकुल योजनांच्या अनुदानात वाढ व्हावी. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरद पवार गट) बुधवारी (दि.१०) इंदापूर शहरातील बाबा चौक ते पंचायत समिती दरम्यान दंडवत आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या अनोख्या दंडवत मोर्चात जिल्हा उपाध्यक्ष समद सय्यद, तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, शहराध्यक्ष ॲड. इनायतअली काझी, शहराध्यक्षा रेश्मा शेख, संजय शिंदे,विकास खिलारे,अनिल ढावरे, अक्षय कोकाटे, दिलीप बेहकरे, श्रीकांत मखरे,अशोक पापत, रायचंद नरळे,अजय पारसे,मनेश जाधव, मालोजी शेंडगे, अनिल दणाने,रोहिदास जगताप, संजय दुपारगुडे, बाळासाहेब चितळकर, विशाल काटकर आदी उपस्थित होते.
गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे. अपंग बांधवांच्या अनुदानात वाढ झालीच पाहिजे. घरकुलासाठी वाळू मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी याप्रसंगी बोंबाबोंब केली.तसेच डीबीटी च्या योजना त्वरित चालू कराव्यात. पाणीटंचाईच्या अनुषंगाने बोरवेलसाठी तात्काळ मंजुरी मिळावी. बंद पडलेले हातपंप दुरुस्त करावेत. कलावंतांच्या अनुदानात वाढ करून रखडलेले अनुदान द्यावे. आंतरजातीय विवाह अनुदानात वाढ करावी. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अल्पभूधारक शेतकरी असलेची अट रद्द करून शिथिल करण्यात यावी. जल जीवन मिशन अंतर्गत चालू असणाऱ्या कामांची गुणवत्ता व दर्जा तपासणीकरीता विशेष पथकाची नियुक्ती करण्यात यावी.अशा एकूण १८ विविध मागण्या असणारे निवेदन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना यावेळी देण्यात आले.दरम्यान,दंडवत मोर्चात सहभागी आंदोलनकर्त्यांनी डोक्याला व हाताला काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध केला.
Web Title: Ncps protest for increase in subsidy for gharkul schemes nrab