After the Chief Minister's statement, 17 lakh government employees are preparing to withdraw their strike
पैठण : राज्यात सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) उद्यास आले आहे, यानंतर या सरकारने कामांचा धडाका सुरु केला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांची औरंगाबाद येथील पैठण (Aungabad paithan) येथे विराट सभा (Sabha) झाली. या सभेसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे देऊन माणसं आणली असल्याची टीका सकाळपासूनच विरोधकांकडून सुरू होती. मात्र, सभेला झालेली विराट गर्दी पाहून ही माणसं पैसे देऊन आले असतील का असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. तसेच पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर जोरदार टिका केलीय. सत्तांतराची लढाई सोपी नव्हती, जर काय नियोजन चुकले असते तर कायमचा शहीद झालो असतो, घरी बसावे लगाले असते, असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सभेला संबोधित करताना सांगितले.
[read_also content=”आंतर महाविद्यालयीन नाटय स्पर्धेचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन https://www.navarashtra.com/maharashtra/inter-college-drama-compititions-inauguration-by-sudhir-mungantiwar-325191.html”]
दरम्यान, या सभेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, बालाजी कल्याणकर आदी उपस्थित होते.