फोटो - सोशल मीडिया
रत्नागिरी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत गौप्यस्फोट केले आहेत. कोटींच्या खंडणी प्रकरणात मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे, आरोप सचिन वाझे यांनी केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी चालू झालेल्या या नवीन मुद्द्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी देखील अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला असून वाझे जसे जसे बोलत जातील तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नितेश राणे म्हणाले, सचिन वाजे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट आहे. मात्र सचिन वाजे यांनी सत्य विधान केलं आहे. सचिन वाजेने सत्य बोलायला सुरुवात केली आहे. अनिल देशमुख यांनी हिंमत असेल तर समोर येऊन खुलासा करावा. सगळ्या गोष्टींचा खुलासा करण्याची हिंमत अनिल देशमुख यांनी करावी. सचिन वाजे यांना दिशा सालीयान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुना संदर्भातील सुद्धा माहिती आहे. सचिन वाजे जसे जसे बोलत जातील तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल. अनिल देशमुख यांनी पेंनड्राईव्ह दाखवण्याची हिंमत कधीतरी करावी, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.
शिवसेना ठाकरे गटाचे शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाने पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. आज ठाकरे गटाचा पुण्यामध्ये मेळावा होणार आहे. त्यापूर्वी नितेश राणे यांनी शिवसंकल्पावर टीकास्त्र डागलं आहे. आमदार राणे म्हणाले, शिवसंकल्प नाव ठेऊ नये अली संकल्प मेळावा ठेवावा. अली संकल्प मेळावा त्यांच्यासाठी जास्त सोयीस्कर नाव आहे. या अली संकल्प मेळाव्यामुळे राज्यातील हिंदू किती सुरक्षित राहील याबद्दल महाराष्ट्रातील हिंदू समाजाने विचार करावा, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
काय म्हणाले सचिन वझे?
मुंबई पोलीस दलातील 100 कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहेत. सध्या वाझे तळोजा कारागृहात बंद आहे. त्याला रात्री वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणलं होतं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी गौप्यस्फोट केला. “जे काही झालं, त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचं सुद्धा नाव दिलय” असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी केला आहे.