मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे लावले जात असताना राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका मांडली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला असल्याची चर्चा आहे. याआधी मंगळवारी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण करण्याबाबत आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे.
[read_also content=”खासदार नवनीत राणांना जेजे रुग्णालयात हलवलं, प्रकृती आणखी खालावली https://www.navarashtra.com/maharashtra/navneet-rana-is-being-taken-to-jj-hospital-in-mumbai-from-byculla-jail-for-her-spondylosis-treatment-nrps-275860.html”]