दीपक केसरकरांचा नेमका रोख कुणाकडे? (फोटो सौजन्य-X)
Deepak Kesarkar: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात येत्या 5 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र मोर्चा काढणार आहेत. याचपार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथे सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वैभव नाईक हे माझे जुने सहकारी आहेत. आधी चांदा ते बांदा ही योजना होती त्यानंतर सिंधुरत्न आणण्यात आली. सिंधुरत्न योजनेची मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. कुठल्याही योजनेची मुदतवाढ करताना त्याला थर्ड पार्टी ऑडिट असावे, ही संकल्पना होती. अनेक वेळा या योजनेचे कौतुक करणारे केवळ राजकारणासाठी ही योजना पुन्हा सुरू करून दाखवा असे सांगत आहेत. या योजनेसाठी ज्या काही फॉर्मलिटी पूर्ण करावे लागतात. मला अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे की, या योजनेला येत्या अधिवेशनात मुदतवाढ जाहीर करण्यात येईल. ऑडिट पूर्ण झाले की या योजनेला १०० टक्के मुदतवाढ मिळेल.
तसेच माझ्यात बोलण्याची काय हिंमत आहे हे महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. मी ज्या वेळेला पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून टीव्हीवर बोलतो त्यावेळी सगळे लोक ते अत्यंत काळजीपूर्वक ऐकतात. कारण कुठल्याही चुकीचं, वाईट, किंवा अतिरंजित बोलत नाही. जिथे आवश्यक आहे तिथे सोशल ऑडिट केलेच पाहिजे. त्यासाठी थोडा वेळ लागतोय कारण त्यासाठी योग्य यंत्रणा आम्ही शोधत आहोत, ते झाल्यावर नक्कीच या योजनेला मुदतवाढ मिळेल, तशी खात्री मला अजित पवारांनी दिली आहे.
त्यामुळे मला हिम्मत नाही असं बोलण्यापेक्षा त्यांनीच अजित पवारांना जाऊन विचारा.
मराठी भाषा कंपल्सरी आहे हे महाराष्ट्रातील जनतेला सांगितलेच जात नाही. दहावीपर्यंत ती कंपल्सरी असून नवीन शैक्षणिक धोरण जे शिक्षणमंत्री असताना ठरविले गेले त्यामध्ये सुद्धा बारावीपर्यंत मराठी भाषा कंपल्सरी आहे. लवकरच त्या संदर्भातला कायदा येईल. त्यामुळे बारावीपर्यंत मराठी हे शिकावेच लागेल. त्यामुळे मराठीवर अन्याय होतो असे म्हणणे चुकीचे आहे. दुसरे म्हणजे महाराष्ट्रात हिंदी ही भाषा पूर्वीपासून कंपल्सरी आहे हे त्यांना माहित नाही का? ही भाषा पाचवीमध्ये कंपल्सरी होती. आता नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर चौथीपासून मुलांना आपण चॉईस देणार की तुम्हाला कुठल्या भाषा घ्यायच्या आहेत! मराठी भाषा कंपल्सरी आहे तर इंग्रजी भाषा इंटरनॅशनल आहे. मग तुम्ही हिंदी घ्या किंवा जर्मनी, स्पॅनिश घ्या, किंवा संस्कृत घ्या कुठलीही भाषा घेऊ शकतात. हे चॉईस मुलांना दिले आहे. आम्ही जर पूर्वीचे धोरण कायम ठेवले असते तर त्यांना हिंदी भाषा कंपल्सरी झाली असती. हिंदी भाषा कंपल्सरी नाही. त्यामुळे राजकारण अशा कुठल्याही गोष्टी त येता कामा नये जे मुलांच्या हिताचे आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात पूर्वीपासूनच हिंदी कंपल्सरी आहे. फक्त ती पाचवीपासून होती. नवीन धोरणानुसार मुलांना चॉईस द्यावा लागेल की तुम्हाला हिंदी घ्यायची आहे की नाही. उगाच राजकारणाला राजकारण करण्याची गरज नाही. मराठी भाषेसाठी नुसते बोलून चालणार नाही तर त्यासाठी काम करावे लागेल. मी मंत्री असताना मराठी भाषेसाठी जे काही केले ते तुम्ही का केले नाही? तुम्ही मराठीच्या नावावरच राज्य केले. तुमचे राजकारणच मराठीच्या नावावर चालते. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला हे उत्तर तुम्ही दिले पाहिजे ना? त्यांच्याबरोबर तुम्ही उभे राहिला नाही, त्याला एकनाथ शिंदे यांना यायला लागले. रमाबाईनगरमध्ये एकावेळी १०० कोटीची थकलेली लोकांची भाडी सरकारने दिली. तेथे बिल्डरला बाहेर काढले आणि आज सरकार येथील बिल्डिंग उभ्या करीत आहे. तुम्ही का नाही करू शकला? तुम्ही का बिल्डरचा नादाला लागला? मराठी माणसाच्या मागे का नाही उभे राहिलात? हा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यामध्ये राजकारण येता कामा नये. मला राजसाहेब ठाकरे यांचे कौतुक वाटते, मराठीबद्दल भूमिका घेताना एकदम स्ट्रेट भूमिका घेतात. एक दिवस मी त्यांची भेट घेऊन हे सर्व त्यांना सांगेन की, हिंदी पाचवीपासून यापूर्वी कंपल्सरी होते ते आता ते कायम ठेवले असते तर मुलांना हिंदी भाषा कंपल्सरी झाली असती. आता हिंदी भाषा कंपल्सरी होणार नाही.
ठाकरे बंधूने एकत्र येणे न येणे हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. ते एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. यावेळी आदित्य ठाकरे उभे राहतात राज ठाकरे आपला कॅंडिडेट उभा करत नाहीत. पण अमित ठाकरे उभे राहतात त्यावेळी शिवसेना आपला कॅंडिडेट देते. याप्रकारे ते वागलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर जायचे की नाही याचा विचार राज ठाकरे यांनी करावा. आमचा तो प्रश्न नाही.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू होते त्यावेळी त्यांनी सावंतवाडी टर्मिनस होईल असे घोषित केले होते. कोकण रेल्वेचे म्हणणे आहे की त्याचे ऑफिशियल नोटिफिकेशन निघायला पाहिजे होते, जर ते निघाले नसेल तर काढता येईल. परंतु त्यामध्ये काही अधिकच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. त्यासाठी सिंधूरत्नमधून निधी देण्यात आला होता. काही काळात टर्मिनस सावंतवाडीतच होईल, कारण तिथून गाड्या सुटतात त्याला टर्मिनस म्हणतात. सावंतवाडीतून रेल्वे मार्गावर गाडी सुटते म्हणजे ते टर्मिनस झाले.