कांदा उत्पादक अडचणीत
परंतु नुकताच झालेला पाउस व या ढगाळ वातावरणाने या कांद्याची थोड्याच दिवसात विक्री करायची, असा निर्णय शेतकर्यांनी घेतला आहे.या मुसळधार पावसामुळे कांदा पिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे शेतकर्यांना कर्ज फेडण्यासाठी तसेच हात उसने घेतलेल्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळे हाताला असलेला कांदा शेतकर्यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्याने मार्केटमध्ये कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली. त्याचा फटका दरावर बसला असून कांद्याचे दर प्रचंड प्रमाणात पडले आहेत. सध्या तीन रुपये किलो पासून १६ रुपये किलो पर्यंत कांद्याची विक्री होत आहे. प्रतवारीनुसार कांदा विकला जात असून शेतकर्यांच्या पदरात सरासरी सहा ते सात रुपये दराने पैसे मिळत आहेत.