संग्रहित फोटो
म्हसवड : श्रीयाळ षष्ठीनिमित्त ३ ऑगस्ट रोजी म्हसवड येथे सालाबादप्रमाणे भव्य कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती म्हसवड येथील जय राजमाने (Jay Rajmane) यांनी दिली आहे.
दरवर्षी म्हसवड येथे श्रीयाळ षष्ठीनिमित्त भव्य कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात येत असते. मागील दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र, यावर्षी सालाबादप्रमाणे तीन ऑगस्ट रोजी कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कुस्त्याच्या मैदानासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातून नामवंत मल्ल उपस्थित राहत असतात. यावर्षीही कुस्त्यांच्या मैदानासाठी नामवंत मल्ल येणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिलेली आहे. या कुस्ती मैदानासाठी खालील मल्ल उपस्थित राहणार आहे.
बाळासाहेब पडघम, सातारा (उपमहाराष्ट्र केसरी), गोरख सरक, फलटण (महाराष्ट्र केसरी), धनाजी फडतरे (महाराष्ट्र केसरी), नागाचे कुमटे, चंद्रकांत सूळ (उपमहाराष्ट्र केसरी) फलटण, आबासाहेब सुळ,
(उपमहाराष्ट्र केसरी) फलटण, नामदेव बडोरे (छत्रपती पुरस्कार विजेते), आटपाडी तालीम, शिवाजी दीड वाघ (महाराष्ट्र चॅम्पियन तालुका माण), वस्ताद भारत भोसले खवासपूर, हनुमंत राजगे राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते. (पिंपरी, तालुका माण), नितीन राजगे (महाराष्ट्र चॅम्पियन), वस्ताद पोपट रुपनवर, (म्हसवड), वस्ताद महालिंग खांडेकर, नाना खांडेकर, पैलवान बाळासाहेब लवटे, पैलवान माणिक वाघमोडे (माळशिरस) हे उपस्थित राहणार आहेत. म्हसवड येथे होणाऱ्या या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.