१४ गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा :३२ गाव पाड्यांत भीषण टंचाई
जव्हार तालुका हा बहुतांश डोंगराळ भाग असल्यामुळे जव्हार तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ही ३२ गाव पाड्यांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातच १४ गाव पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ५ टैंकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. शिवाय १८ गावांचे टंचाई प्रस्ताव जव्हार पंचायती समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्तावित आहेत. तालुक्यातील खरंबा, सागपाणी, रिठीपाडा, कासटवाडी, रामपूर, तळ्याचापाडा, सुळ्याचापाडा, हिरडपाडा, बांबरेपाडा, कापरीचापाडा, काळीधोंड, कातकरीपाडा, नंदनमाळ या आहे. गावांना यावीं मार्च महिन्यापासूनच टंचाईला सुरवात झाली आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त सहा गावांमध्ये पंचायत समितीद्वारे एक दिवसाआड टैंकरने पाणी पुरवठा सुरु आहे, तर आठ गाव पाड्यांना सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे.
जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
यावर्षी मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. गत वर्षी २३ गावे टंचाईग्रस्त होते. मात्र, यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत ३२ गावंपाडांना झळ बसली आहे.
शासकीय यंत्रणा गावक-यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी गुरांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
गुरांच्या पाण्याचा प्रश्न विकट असून त्यांना जास्त पाणी लागत असल्याने अनेकांनी त्यांना माळरानावर सोडले
१८ गावांचे पंचायत समितीकडे प्रस्ताव
जव्हार पंचायत समितीकडे १८ पाणी टंचाई गावांचे नवीन प्रस्ताव येवून पडले आहेत. कौलाळे, घिवंडा पळपाडा, कायरी, हट्टीपाडा, भोयेपाडा, उक्षिपाडा, सेळीपाडा,मोहपाडा, चाफ्याचापाडा, धानोशी, कडाचीमेट, कुतुरविहीर, भांगरेपाडा, आकरे, कंहडोलपाडा, धोदडपाडा, जांबुळमाथा, पाचबुड या गावांनाही पाणीटंचाई सुरू झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाकडे ठराव करून दिला आहे.
१४ गाव-पाड्यांची तहान भागवण्यासाठी ५ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
२३ मार्च महिन्यापासून गेल्यावर्षी तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त होती. यावर्षी उशीरा टंचाई निर्माण झाली आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट
पाणवठ्यांवर वादाचे प्रसंग; टँकर विहिरीत रिकामे
पिण्याच्या पाण्यासाठी दिवसाआड पुरवठा होत असल्याने पाणवठ्यावर वाद होत आहेत. विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्रास झाला तरी चालेल मात्र पाण्यावरून वाद नको म्हणून पाण्याचा आलेला टैंकर विहिरीत सोडला जात आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात ही समस्या आणखी कट होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.