समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
गंगाखेड : गंगाखेड आगाराची बस अहमदपूर येथून गंगाखेडला येत होती. दरम्यान, पिंपळदरी येथील निळा नाईक तांडा उताराच्या रस्त्यावर बसच्या समोर अचानक शेळ्या आल्या. शेळ्यांना वाचवण्याच्या नादात धावत्या बस चालकाने अचानक जोरात ब्रेक लावले. त्यामुळे बस सात फूट खोल दरीत कोसळल्याने 20 प्रवाशी जखमी झाले. जखमींपैकी चार जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 10 फेब्रुवारी सोमवारी अकराच्या सुमारास घडली.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana : अपात्र बहीणींचा सरकारच्या तिजोरीवर डल्ला; तब्बल ‘इतक्या’ कोटींचा बसला राज्य सरकारला फटका
गंगाखेड आगराची बस सकाळी 8 वाजता अहमदपूर (जि.लातूर) येथे फेरी मारते. सकाळी गंगाखेड बसस्थानकातील तसेच या मार्गावर थांबा असलेल्या गावातील प्रवाशी घेऊन सुखरूप अहमदपूरला पोहचली. अहमदपूर येथून बस (क्र. एमएच २० डिएल १७९२) ही बस परत गंगाखेडला 30 प्रवाशी घेऊन निघाली होती. पिंपळदरीपर्यंत आली असता निळा नाईक तांडा उतारावर शेळ्या एकदम बससमोर आल्या. या शेळ्यांना वाचवण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सात फूट दरीत कोसळली. त्यामुळे बसमध्ये 30 प्रवाशी होते. त्यातील 20 प्रवाशी जखमी झाले.
मंदोदरी नागरगोजे, शांताबाई नागरगोजे, विठ्ठल अटके, ज्ञानोबा नागरगोजे, मिनाबाई नागरगोजे, प्रल्हाद अटके, जनार्धन नागरगोजे, धोडाबाई नागरगोजे, गणपत जायभाय, दत्तराव नागरगोजे, वैजंताबाई जायभाय, वैजनाथ नागरगोजे, सुशिलाबाई नागरगोजे, सुखदेव रायभोळे ( सर्व रा. दामपुरी ता. गंगाखेड) आहेत. तर आशा आंधळे (खोकलेवाडी), किशन कच्छवे (दैठाना), मंगलबाई कांबळे (अंघोरी ता. अहमदपूर), अनुजा पैके (रा. धर्मापुरी), प्रांजल कांबळे (अंघोरी), संचिता पैके (रा. धर्मपुरी), सनमय कांबळे (अंघोरी), प्रदीप कांबळे अशी जखमींची नावे आहेत.
फायरपिंग भागात एक भीषण अपघात
नेपाळच्या काठमांडूपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिणेकडील दक्षिणकाली नगरपालिकेच्या फायरपिंग भागात एक भीषण अपघात घडला आहे. एक बस डोंगरावरुन कोसळून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, 41 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये एका 8 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस 120 मीटर खोल डोंगरळार परिसरातून खाली कोसलून अपघात झाला.
हेदेखील वाचा : Anjali Damania on Devendra Fadanvis: हीच देवेंद्र फडणवीसांची रणनीती…; अंजली दमानियांचा गंभीर आरोप