Photo Credit- Social Media
माळशिरस: विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावातच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली. 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतगान प्रक्रियेत या गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून आल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया राबवण्याची संपूर्ण तयारीही केली. आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार, त्यापूर्वीच गावात पोलीस प्रशासन दाखल झाले, गावात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच एकही मतदान झाल्यास गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. गावात तणावाचे वातावरण नको म्हणून अखेर उत्तमराव जाणकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून अखेर मतदान प्रक्रिया थांबवण्याच निर्णय़ घेतला. पण त्याचवेळी त्यांनी सरकारची पोलखोल होऊ नये म्हणून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. प्रशासन घाबरल्यानेच आम्हाला मतदान करू दिले जात नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
याबाबत बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले, एकही मतदान झाल्यास आम्ही तुमच्या मतपेट्या आणि इतर साहित्य घेऊन जाऊ. सर्व गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करू. गावात 144 कलम लागू कऱण्यात आली आहे. गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, प्रशासनाच्या विरोधात जाऊन मतदान केल्यास गोंधळ उडेल आणि वातावरण खराब होईल, लोक निघून जातील. 1500 जणांचे मतदान झाल्याशिवाय निकालही लागू शकणार नाही. पण गावकऱ्यांना मतदान करू द्यायचे नाही आणि साहित्यच घेऊन जायचं असा पोलिसांचा प्लॅन आहे. त्यामुळे आम्ही येणाऱ्या आठ दिवसात प्रांत कार्यालय किंवा न्यायालयात आम्ही ताकदीने लढा देऊ. हा आक्रोश निवडणूक आयोगापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू, न्याय मिळाल्याशिवाय उत्तमराव जानकर थांबणार नाही.
Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंनी सोडला गृहमंत्रीपदाचा हट्ट; काल रात्री ठाण्यात काय घडलं?
बॅलेट पेपरवर मतदान झाल्यास तुम्ही जिंकाल असा विश्वास का वाटतो, असा प्रश्न विचारला असता, या गावात 1400 मतदान मला आणि 502 मतदान समोरच्या ( राम सातपुते) उमेदवारास झाले. या तालुक्यातला अभ्यास केल्यानंतर त्यांना 1003 असं मतदान झालं म्हणजेत त्या मशीनमध्ये तशी सिस्टीमच बनवण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला पडताळणी करायची होती. आम्ही दिलेलं मत उत्तमराव जानकरांना न जाता दुसऱ्यांना का गेलं. त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनाचे सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती. पण पोलिसांनी जमावबंदीचे आदेश काढत मतदान प्रक्रिया थांबवण्याच आदेश काढले. ही प्रक्रिया होऊ द्यायची नव्हती. याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात अशा हे चित्र जाणार होतं. हे लाईव्ह मतदान होणार होतं. प्रशासनाने करू दिलं असत तर सर्व समोर आलं असतं.
कालपासून एक हजाराहून अधिक लोक इथ होते. पण पोलिसांच्या भितीने लोक आपापल्या घरी निघून गेले. पोलिसांच्या भितीने लोक यायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जे इथं घडलं तेच संपूर्ण राज्यात घडलं आहे. एक मत भाजपला ट्रान्सफऱ झाल्याशिवाय दुसरं मत भाजपला जात नव्हतं.त्यामुळे त्यांना ५४ हजार मतं पडली, त्यामुळे त्यांना एक लाख चार हजर मतं झाली. त्यामुळे त्यांचा एकास एक असा फॉर्म्युला आहे. त्यामुळेच त्यांनी जाणीवपूर्वक मतदान प्रक्रिया थांबवली. मतं ट्रान्सफर झाल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर जानकर म्हणाले, येत्या आठ दिवसात मी त्याचं प्रात्यशक्षिक तुम्हाला दाखवून देईल. त्यासाठी आम्ही गावात मतदान करण्याचा अट्टहास होता.
International Day Of Persons With Disabilities: ‘दिव्यांग व्यक्तींना समानतेची