संग्रहित फोटो
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहे. कधी तीव्र उष्णता तर कधी अवकाळी पाऊस अशी स्थिती दिसत आहे. त्यात आता अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, पुढील दोन दिवसांत त्याचे रूपांतर चक्रीवादळात (Cyclone) होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा (Rain Possibilities) अंदाज आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 5 ते 7 जून या दोन दिवसांच्या कालावधीत चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि कोकण प्रदेशासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि अचानक पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
हवामान विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं की, 5 जूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. दोन दिवसांत कमी दाबाचं क्षेत्र वाढत जाऊन 7 जूनपर्यंत त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 27 अंश सेल्सिअस असावे लागते. सध्या अरबी समुद्राचे तापमान 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून ते चक्रीवादळास अनुकूल आहे.