फोटो सौजन्य - नाना पटोले फेसबुक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्याचबरोबर सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, पक्ष संघटनेला प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक काम असले पाहिजे त्या दृष्टीकोणातून आम्ही जागांची मागणी केली आहे. जागावाटपात ज्या जागा सुटतील त्यावर आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही महाविकास आघाडीच्या नावावर निवडणूक लढू असे नाना पटोले म्हणाले. पुढे ते म्हणाले की, खेळ माझा आवडता विषय आहे, स्वाभाविक एमसीएचे महत्व आहे, अनेक तळागाळातील खेळाडूला संधी मिळत नाही. उद्या चांगले खेळाडू राहावे, येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आहे, निवडणूक लढायची की नाही, हे ठरेल. वर्ल्ड कप कायम मिळत राहावं यासाठी स्वप्न बघितले पाहिजे असे नाना पटोले यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, वायकर उमेदवार झाले तेव्हा उत्तर मिळाले, यात क्लिनचीटवर जास्त बोलायचे नाही, भ्रष्ट लोकांचा सरदार नरेंद्र मोदी आहे. लोकभावना जुळल्या आहेत, स्ट्रक्चरमुळे आस्थेला धोका असेल तर धक्का लागणार आहे. विधानसभेत भूमिका मांडली, जनभावनेला आणि आस्थेला भाजप किंमत देत नाही याचाच परिणाम दीक्षाभूमीवर दिसेल. खरी मॅच आता सुरू होईल जनता उत्तर देईल, मुख्यमंत्री यांना आनंद साजरा करू द्या, मूठभर लोकांना मदत करणारे मुख्यमंत्री आहे, जनता कॅच घेईल असे टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.
सात वर्षाची मुलगी करंट लागून भंडाऱ्यात मरण पावली. आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर नाही, मशिनरी नाही, मलिंदा खाण्याचे काम सुरू आहे, चालवणारी लोक नाही डॉक्टर नाही नर्स नाही. आम्ही सगळे भरू असे सांगतात, 2014 ते 2019 मध्ये मेगा भरती करायला निघाले, जाहिराती काढून दिशाभूल सुरू आहे. राज्यसरकारने कायदा करा, पेपरफुटी होऊन महाराष्ट्रात छळ सुरू आहे अशी टीका सरकार केली आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही, गृहमंत्री आहे, नुसत्या घोषणा नाही, जेलमधून कैद्यांना पंचतारांकित व्यवस्था सुरू आहे. नागपूरच्या घटनेत मालू हिट अँड प्रकरणात कशी मदत केली..ते पहिले आहे, त्यामुळे पोलिसांची किंमत कमी केली आहे असे नाना पटोले म्हणाले.
महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आहे, केंद्राच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आहेत, महाराष्ट्रासहित अनेक राज्यात वीज महाग होत आहे, आम्ही फ्री वीज देणार असे राज्यसरकार सांगत आहे. विद्युत फ्री मिळणार हे भविष्यातही सांगत आहे, पण तुम्ही भविष्यात रहाणार नाही. अजित पवार म्हणतात फ्री देणार, याला काळ लागणार आहे, थापा मारण्याचे काम विधानसभेत खोट बोलून करत आहेत, लोक निर्णय घेतील असा निशाणा नाना पटोले यांनी अजित पवारांवर साधला.