File Photo : Tomato
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची प्रतिक्षा असताना काही ठिकाणी उन्हाचा तडाखा बसला आहे. आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळीने टोमॅटोची स्थानिक पातळीवरील आवक घटली आहे. याचा परिणाम मुंबईला रोज पाठविल्या जाणाऱ्या मालावर झाला आहे.
यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊन-पावसाच्या खेळाने करपा रोगाची लागण झाली. झाडांची उंची चांगली न वाढता रोपे खुरटी राहिली. याचा परिणाम उत्पादनावर होत यंदा मोठी घट झाली आहे. यामुळे बाजारातील दर किलोला शंभरच्या आसपास आहेत. यंदा उन्हाचा पारा चाळिशीच्या वर राहिल्याने टोमॅटोच्या उत्पादनास त्याचा मोठा फटका बसला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 ते 15 हजार जाळ्यांची (एक जाळी 20 किलो) आवक होत असते. सध्या हे प्रमाण तीन हजार जाळ्यांवर आले आहे. घाऊक बाजारात क्विंटलला सरासरी चार हजार रुपये दर आहे. पावसामुळे मालाच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील आवक कमी झाल्याने काही व्यापारी संगमनेर परिसरातून किरकोळ विक्रीसाठी माल आणत आहेत.
नाशिकमध्ये आवक कमी
नाशिकच्या बाजार समितीत सध्या टोमॅटोची 80 टक्के आवक कमी झाल्याचे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले. अवकाळी फटका तर कधी गारपिटीची आपत्ती यामुळे शेती व्यवसायाचे सगळे गणितच सध्या बिघडले आहे.
उत्पादन 100 कॅरेटने घटले
यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊनपावसाच्या खेळाने करपा रोगाची लागण झाली. झाडांची उंची चांगली न वाढता रोपे खुरटी राहिली. अशा रोपांना नेहमीच्या प्रमाणात फळे कमी लागतात. याचा परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावर होत यंदा मोठी घट झाली आहे.