संग्रहित फोटो
पुणे : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. अशातच आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) पुणे शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
भाजयुमो शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या त्रिसूत्रीचा संकल्प मनाशी बाळगून नवीन कार्यकारिणी जाहीर करताना सांगितले की, ही जबाबदारी म्हणजे केवळ पद नसून राष्ट्रसेवेची संधी आणि युवा शक्तीला योग्य दिशा देण्याचे व्रत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून अथर्व कुलकर्णी, माऊली उंद्रे, सिद्धार्थ भावकर, संकेत बिरामणे, तेजस मारणे, यशराज टिळेकर, अॅड. समीर जोरी, निलेश कदम, स्वप्निल गाडे, सुचित देशपांडे, राजवीर आव्हाड, संकेत जाधव, योगेश जगताप, संकेत शितोळे आणि राज भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
सरचिटणीस म्हणून प्रणव गंजीवाले, रोहन कोकाटे आणि योगेश जावीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चिटणीसपदी कुणाल गरुड, आकाश थोरात, प्रशांत लाटे, यश ओव्हाळ, सुमित घुले, प्राजक्ता जोशी आणि इतर कार्यकर्ते नियुक्त झाले आहेत. मनीष पाडेकर, आशिष सुर्वे, ओंकार डवरी आणि प्रतीक कुंजीर हे समन्वयक म्हणून कार्यभार सांभाळतील.
अनिरुद्ध कोकणे आणि शिवम बालवडकर संपर्क प्रमुख, तर मनीषा धारणे यांची युवती आघाडी संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज गीते विद्यार्थी आघाडीचे संयोजक, प्रथम भालेराव सहसंयोजक, सागर शेटे सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम संयोजक, विराज रानवडे क्रीडा आघाडी प्रमुख, तर सीए सर्वेश मेहंदळे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील. या प्रसंगी मोहोळ यांनी युवा कार्यकर्त्यांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे.






