मतदन आणि निकालांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, वाचा सविस्तर
Pune Municipal Election Voting: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. आज, १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन्ही शहरांतील एकूण २९३ जागांसाठी ही निवडणूक होत असून, सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
दरम्यान मतदानाच्या काळात मतदारांना वेळ मतदान केंद्रावर पोचण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहराच्या विविध भागांतील वाहतूक व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. पुणे वाहतूक पोलिस प्रशासनाकडून १४ ते १६ जानेवारी या काळात वाहतुकीसाठी विशेष नियम जारी केले आहे. यात सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत शहकातील विविध भागांतील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे शहरातील महत्त्वाच्या सहा वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर हे बदल करण्यात आले आहेत. या काळात जड वाहने आणि खाजगी वाहनांना प्रवेशबंदी लागू असेल. (Maharashtra Local Body Elections)
१. हडपसर विभाग
हडपसरमध्ये मतदानाची मुख्य केंद्रे असल्याने या भागात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने साने गुरुजी परिसराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी हडपसर वेस्ट अमरधाम स्मशानभूमी मार्ग किंवा माळवाडी डी.पी. रस्त्याच्या वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून कऱण्यात आले आहे. तसेच, हडपसर गाडीतळापासून संजवनी हॉस्पिल डी.पी. रस्ताही वाहतुकीसाठी खुला आहे.(municipal elections)
२. कोरेगाव पार्क विभाग
कोरेगाव पार्कच्या अंतर्गत रस्त्यांवरील संवेदनशील केंद्रांमुळे निर्बंध लादण्यात आले आहेत. नॉर्थ मेन रोड (लेन क्रमांक ‘सी’) ते पाणीपुरवठा केंद्र, बंडगार्डन घाट आणि महात्मा गांधी चौक ते मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक, हे मार्ग बंद राहणार आहेत. त्याऐवजी कोरेगाव पार्क जंक्शन ते एबीसी फार्म या मुख्य रस्त्याचा पर्यायी रस्ते म्हणून वापर करावा. (PMC Election 2026)
३. समर्थ वाहतूक विभाग
शहर पोलीस वाहतूक शाखेने पुणे स्टेशन आणि मध्यवर्ती पेठांना जोडणाऱ्या भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे फेरबदल केले आहेत. पेठांमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पॉवर हाऊस चौक ते बालाजी चौक, संत कबीर चौक ते क्वार्टर गेट चौक, रामोशी गेट ते जुना मोठा स्टँड हे मार्ग बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग
वाहनचालकांनी आपला प्रवास सुखकर करण्यासाठी शांताई हॉटेल मार्गे प्रवास, क्वार्टर गेट चौक आणि बाहुबली चौक.‘सेव्हन लव्हज’ चौक मार्गांनी प्रवास करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
PMC Elections 2026 : लोकशाहीचा कणा कमकुवत; मतदानाच्या दिवशीच EVM बंद पडल्याने संशय
४. विमानतळ (विमान नगर) परिसर
विमानतळ (विमान नगर) परिसातील फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता, सॉलिटेअर इमारत आणि निको गार्डन या भागातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. या मार्गांऐवजी विमान नगर चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक आणि दत्त मंदिर चौक या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
५. विश्रामबाग आणि दत्तवाडी विभाग
विश्रामबाग: पुरम चौक ते टिळक चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार असून नागरिकांनी शास्त्री रस्त्याने दांडेकर पुलामार्गे प्रवास करावा. याशिवाय बाजीराव रस्त्यावरील सनस पुतळा ते ना. सी. फडके चौक आणि सारसबागेत खाऊ गल्ली मार्ग बंद राहणार आहेत. या मार्गांवरील वाहतूक अप्पा बळवंत चौक (ABC) आणि पुरम चौकाच्या बाजून वळवण्यात आली आहे.






