एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ (फोटो- सोशल मिडिया)
एचएसआरपी म्हणजे काय?
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट; चोरी व बनावट नंबर टाळणारी सुरक्षा पाटी.
15 ऑगस्टनंतरही ‘या’ वाहनांवर होणार नाही दंडात्मक कारवाई
सध्या अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) असल्याचे पाहिला मिळत आहे. तर काही वाहनांवर अद्यापही अशा नंबर प्लेट दिसत नाही. परिवहन विभागाने एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी अंतिम मुदत 15 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.
HSRP Plate : 15 ऑगस्टनंतरही ‘या’ वाहनांवर होणार नाही दंडात्मक कारवाई; कारणही आहे तसंच…
15 ऑगस्टनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट 1 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, ज्यांनी 15 ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली आहे, परंतु फिटमेंट त्या नंतरच्या तारखेला आहे, त्यांना दंड लागणार नाही. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना (दुचाकी, तिनचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि खासगी) एचएसआरपी बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम, लेसर-एच्ड युनिक आयडी आणि नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक असलेल्या टॅम्पर-प्रूफ प्लेट्सचा समावेश आहे.