• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Many Veteran Leaders Have Been Defeated In The Pune Municipal Corporation Elections

Pmc Election Result : दिग्गजांना नवख्यांकडून घरचा रस्ता; ‘या’ बड्या नेत्यांचा पराभुतांमध्ये समावेश

महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळविताना विरोधी पक्षातील अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ माजी नगरसेवकांना नव्या भिडूंनी घरचा रस्ता दाखविला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 18, 2026 | 11:40 AM
Pune Mayoral Election, Pune Municipal Election 2026, Pune Politics,

Pune Mayoral Election: PMC Mayoral Election:महापौर-उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर; पुण्याला कधी मिळणार नवा महापौर?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दिग्गजांना नवख्यांकडून घरचा रस्ता
  • बड्या नेत्यांचा पराभुतांमध्ये समावेश
  • जाणून घ्या पराभूत झालेल्यांची नावे
पुणे : महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळविताना विरोधी पक्षातील अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ माजी नगरसेवकांना नव्या भिडूंनी घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामध्ये सर्वच विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांचा समावेश आहे. माजी महापाैर दत्ता धनकवडे, माजी उपमहापाैर आबा बागुल, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष सुशील मेंगडे, माजी उपमहापाैर बंडू गायकवाड आदींचा यात समावेश आहे.

सहावेळा नगरसेवकपद भूषविलेले व शिवसेनेकडून लढविणाऱ्या आबा बागुल यांचा भाजपच्या महेश वाबळे यांनी पराभव केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा भाजपच्या संदीप बेलदरे यांनी पराभव केला, तर महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रकाश कदम यांचा भाजपच्या नवख्या व्यंकोजी खोपडे यांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या वीणा गणेश घोष यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांचा भाजप शैलजा भोसले यांनी पराभव केला.

पुणेकरांचे लक्ष लागलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांचा गणेश बिडकर यांनी पराभव करून २०१७ च्या पराभवाची परतफेड केली. तर धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी पराभव केला. धंगेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना अटीतटीच्या लढतीत अवघ्या ६२ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या विवेक यादव यांनी त्यांचा पराभव केला, तर शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना राष्ट्रवादीचे निवृत्त बांदल यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचाही पराभव झाला, तर माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांना त्यांचे पुतणे भाजपचे उमेश गायकवाड यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. गायकवाड यांनी मनसेचे नेते बाबू वागस्कर यांचा पराभव केला, तर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांना भाजपच्या निवेदिता एकबोटे यांच्याकडून थोडक्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या बंडू ढोरे यांचाही भाजपच्या सनी निम्हण यांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसवासी झालेले प्रशांत जगताप विजयी झाले, तर त्यांच्या मातोश्री ज्येष्ठ माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांनाही भाजपच्या कालिंदी पुंडे यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत अखेरच्या क्षणी शिवसेनेतून भाजपवासी झालेले माजी नगरसेवक संजय भोसले यांना काँग्रेसच्या विशाल मलके यांनी पराभवाची धूळ चारली. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या सुनीता गलांडे आणि संदीप जऱ्हाड यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधील अमाेल बालवडकर आणि भाजपचे लहू बालवडकर यांची लढत ही लक्षवेधी हाेती. या लढतीत अमाेल बालवडकर यांनी बाजी मारली. तसेच या प्रभागात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे हे देखील विजयी झाले. त्यांनी भाजपचे गणेश कळमकर यांचा पराभव केला. एकीकडे भाजपला दणदणीत यश मिळाले असतानाच भाजपच्या माजी नगरसेविका व माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांचा काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी धक्कादायक रित्या पराभव केला, तर वारजे-कर्वेनगर भागातील भाजपचे माजी नगरसेवक सुशील मेंगडे यांचा राष्ट्रवादीच्या स्वप्नील दुधाने यांनी पराभव केला.

हे सुद्धा वाचा : माझा पराभव करण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद लावली होती, पण…; विजयानंतर अमोल बालवडकर यांची प्रतिक्रीया

Web Title: Many veteran leaders have been defeated in the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Election Result
  • pune news
  • Vasant more

संबंधित बातम्या

ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…
1

ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
2

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल
3

नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; सुनीता शरद बुट्टे पाटील यांचा दणदणीत विजय
4

पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; सुनीता शरद बुट्टे पाटील यांचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

Feb 09, 2026 | 11:24 PM
काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

Feb 09, 2026 | 11:23 PM
कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

Feb 09, 2026 | 10:15 PM
कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

Feb 09, 2026 | 10:05 PM
माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

Feb 09, 2026 | 09:59 PM
चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

Feb 09, 2026 | 09:42 PM
Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

Feb 09, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.