पुणे महानगरपालिका (फोटो- सोशल मीडिया)
महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर
सर्वसाधारण महिला प्रवर्गाची निघाली सोडत
पुण्यात 67 महिला नगरसेवक आल्यात निवडून
पुणे: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान झालं, तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली आणि यानंतर आज महापालिकेमधील महपौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत घोषणा झाली. सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली गेली असून पुणे महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची सोडत निघाली असल्याने भाजपकडून या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तब्बल ९२ महिलांना उमेदवारी देण्यात आली होती यात ६७ विजयी झाल्याअसून महापालिकेत महिला राज असताना आत्ता महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची सोडत निघाली असल्याने भाजपकडून वर्षा तापकीर, मानसी देशपांडे,स्वरदा बापट,स्मिता वस्ते,मंजुषा नागपूरे, ऐश्वर्या पठारे,सायली वांजळे,निवेदिता एकबोटे,या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे…
अनेकांचे स्वप्न झाले भंग…
पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत निघाल्याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये महापौर पदासाठी तयारी करणाऱ्या भाजप नेत्यांचं स्वप्न भंग झाल आहे.यामध्ये माझी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष धीरज घाटे,माजी सभागृह नेते गणेश बिडकर या तीन नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती आणि त्यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सबाजी करत महापौर म्हणून शुभेच्छा देखील देण्यात आल्या होत्या.
Maharashtra Politics: खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषदेत राजकीय घमासान; ‘या’ उमेदवारीमुळे चुरस वाढली
यावेळी नगरसेविका वर्षा तापकीर म्हणाल्या आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या लाडक्या बहिणीवर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणावर महापालिकेच्या निवडणुकीत महिलांना संधी दिली आहे.दक्षिण पुण्यासाठी चार वेळा नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मला भारतीय जनता पक्षाने दिली आहे आणि पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील तो सर्वस्वी असणार आहे अस यावेळी त्यांनी सांगितल.
खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषदेत राजकीय घमासान
दौंड तालुक्यातील खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तीन तुल्यबळ नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या गटातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः डॉ. हर्षदा काळे यांनी माघार न घेतल्यास या लढतीत प्रचंड चुरस वाढणार, अशी चर्चा आज पहिल्याच दिवशी तालुक्यातील वाडी-वस्तीपर्यंत सुरू झाली आहे.
लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ; नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट
दौंड तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण सात गट असून, त्यामधील सर्वाधिक लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची लढत खडकी–देऊळगाव राजे गटात होणार असल्याचे स्पष्ट चित्र आजच समोर आले आहे. 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. या गटातून भाजपचे ज्येष्ठ व मान्यवर नेते वासुदेव नाना काळे यांची कन्या डॉ. हर्षदा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.






