पुणे शहरात थंडीचा जोर ओसरला (फोटो- istockphoto)
पुणे शहरात थंडीचा जोर ओसरला
पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहणार
किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ
पुणे: बांगलादेशच्या पूर्व भागात आणि आसपासच्या भागात तसेच दक्षिण केरळच्या किनारपट्टी परिसरात चक्रीय वाऱ्यांची प्रणाली कायम आहे. या प्रभावामुळे किमान तापमानात (Weather) वाढ झाली असून, शहरातील (Pune City)थंडी ओसरली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहणार असून त्यानंतर मात्र त्यामध्ये घट होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुणे आणि परिसरात किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे. शनिवारी (ता. ६) किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, १४.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले; तर कमाल तापमान स्थिर आहे. पुढील दोन दिवस किमान आणि कमाल तापमान स्थिर राहणार असून, त्यांनतर मात्र पुन्हा किंचित घट होणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
‘या’ तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा
देशाच्या सर्व भागात वातावरण बदल झाला असून तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पावसाच ढग जाण्याचे नाव घेत नाही. याचदरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात तीन ते चार दिवसांत गारठा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पाऊस इतका जोरदार सुरू झाला आहे की, मागील सर्व विक्रम मोडले आहेत. काही राज्यांमधून पाऊस जाण्याचे अजिबात नाव देखील घेत नाही.
IMD Weather Update : हुडहुडी! ऐन थंडीत पावसाचा कहर, ‘या’ तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा
दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण वाढत आहे. सरासरी एक्यूआय ३०४ वर आहे, अनेक ठिकाणी ४०० च्या जवळपास नोंद झाली आहे. शिवाय, तीव्र थंडी दिल्ली-एनसीआरपर्यंत पोहोचली आहे. याचदरम्यान हवामान विभागाने इशारा दिला आहे की, दिल्ली-एनसीआरमध्ये थंडी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, कारण पर्वतांमध्ये निर्माण झालेल्या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या उंच भागात ८ डिसेंबरपर्यंत तीन दिवस मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.






