नागरिकांनो सावध व्हा, तो पुन्हा येतोय...! पुढील 48 तास धोक्याचे, आता कुठे अतिमुसळधार पाऊस कोसळणार? (फोटो सौजन्य-X)
बंगालच्या उपसागराच गोंधळ सुरु असून आधी सेनयार चक्रीवादळ आणि आता डिटवाह चक्रीवादळ महाराष्ट्रावर घोंगावतोय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत आलेल्या धुमाकूळ घातलेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे भारतामध्ये देखील काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळसह, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुद्दुचेरी आणि अंदमान आणि निकोबार या बेटांवर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात चक्रीवादळाचाही हा परिणाम असणार आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण राहील, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर उर्वरित महाराष्ट्रात फक्त तीव्र थंडी पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
महाराष्ट्रात हवामान बदलत आहे, पुण्यासह अनेक शहरांमध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे. येत्या काही दिवसांत ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई वगळता राज्यभर तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे, ज्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा थंडीचा अनुभव येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळी धुके पडेल, नंतर आकाश निरभ्र होईल. मुंबईतील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस होते. इतर कोकण जिल्ह्यांमध्येही अशीच हवामान परिस्थिती राहील.
तसेच पुण्यातील किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. कोल्हापूरमध्ये ढगाळ सकाळनंतर दुपारी आकाश निरभ्र होईल, तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. सकाळी उत्तर महाराष्ट्रात दाट धुके राहील, ज्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. नंतर आकाश निरभ्र होईल, किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. जळगावमध्ये किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील.
मराठवाड्यातही थंडी वाढली आहे. येत्या काही दिवसांत थंडीचा जोर वाढेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेडमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहील. विदर्भात अंशतः ढगाळ आकाश आणि धुके राहील, ज्यामुळे थंडी वाढेल. नागपूरमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्येही अशीच हवामान परिस्थिती राहील. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी घसरू शकते. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






