पुणे: पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथून अपघाताची एक घटना समोर आली आहे. भरधाव पीएमपीएमएल ई-बसने एका गर्भवती महिला आणि ९ वर्षीय मुलीला धडक दिली. या अपघातात एका ९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला तर गर्भवती महिला जखमी झाली आहे. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली असून अपघाताचे सीसीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. देहूरोड पोलिसांनी बस चालक किरण भटू पाटील (वय 35) याला अटक केली आहे.
काय घडलं नेमकं?
अपघातात मृत झालेल्या मुलीचे नाव सुधा बिहारीलाल वर्मा असे आहे. तर गर्भवती महिलेचे नाव राममनोज वर्मा असे नाव आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने हा अपघात घडला आणि चालक किरण भटू पाटील यांच्या पोलिसांनी अटक केली आहे. 9 डिसेंबर रोजी नाईट शिफ्ट करून राधाचा पती घरी परतला आणि झोपला होता, तेव्हा राधा ही कामावर गेली होती. नंतर दुपारी 1 वाजता ती घरी परतत असताना रस्ता ओलांडताना त्यांना एका भरधाव बसने धडक दिली होती. या धडकेत सुधाचा मृत्यू झाला, तर राधा ही गंभीरपणे जखमी झाली होती. तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Goa Nightclub Fire प्रकरणात मोठी अपडेट, क्लबचे मालक लुथरा बंधू थायलंड मधून ताब्यात
राधा आणि तिचा पती तळवडे येथे एका खाजगी कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. महिला ही गर्भवती असल्याने त्यांनी दोन महिन्यापूर्वी गावातील धाकट्या बहिणीला मदतीसाठी बोलावले होते. तसेच त्यांचा भाऊ देखील रोजगारासाठी एका खासगी कंपनीत काम करतो. तो देखील त्यांच्यासोबतच राहतो.
रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड
पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हॉस्पिटल प्रशानसाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडला असून रुग्णालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये घुसून रिसेप्शन विभाग, काचेच्या पार्टिशन आणि संगणकांची तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तोडफोडीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी रुग्णाच्या मृत्यूवरून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येत आहे.
Ans: 9 वर्षीय सुधा बिहारीलाल वर्मा हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Ans: रस्ता ओलांडताना भरधाव ई-बसने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली.
Ans: होय. सीसीटीव्ही फुटेजवरून चालक किरण भटू पाटील याला अटक करण्यात आली आहे.






