एसटी बस (फोटो-सोशल मीडिया)
पुणे : दिवाळीच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजना यांना पुणे विभागात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण ३१ लाख ६११ महिला व ज्येष्ठ प्रवाशांनी या योजनांचा लाभ घेतला. त्यापैकी महिला सन्मान योजनेचे लाभार्थी २२ लाख ७३ हजार ७०९, अमृत ज्येष्ठ योजनेचे ६ लाख २८ हजार ९९५ आणि ज्येष्ठ नागरिक योजनेचे १ लाख ९७ हजार ९०७ प्रवासी असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा : IND vs AUS 5th T20 : “जर मला संधी मिळाली…” मालिकावीर अभिषेक शर्माने उघड केले खास स्वप्न
‘महिला सन्मान योजना’ ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत देणारी योजना आहे. ही योजना १७ मार्च २०२३ पासून सुरू झाली असून, या योजनेअंतर्गत २२ लाख ७३ हजार ७०९ महिलांनी लाभ घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) सर्व प्रकारच्या बसमध्ये ही सवलत लागू आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची योजना आहे, ज्या अंतर्गत ७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून पूर्ण वर्षभर अमर्याद आणि मोफत प्रवास करता येतो. या योजनेतून ६ लाख २८ हजार ९९५ अमृत ज्येष्ठ प्रवाशांनी लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ५८५ रू भरून एक ‘स्मार्ट कार्ड’ तयार करूण घ्यावे लागते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळात ६५ ते ७४ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये तिकीटावर ५० टक्के सवलत आहे, योजनेअंतर्गत १ लाख ९७ हजार ९०७ ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी एसटीचे विशेष ओळखपत्र अनिवार्य आहे.
महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एसटी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन एसटीने प्रवास करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.”. अरुण सिया, विभाग नियंञक,पुणे एसटी विभाग






