संग्रहित फोटो
पुणे/चंद्रकांत कांबळे : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी लागू असलेल्या स्कूलबस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ०१ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या चार महिन्यांत विशेष मोहिम राबवून कारवाई केली आहे. या कालावधीत एकूण ६३३ वाहने तपासली आहेत. त्यापैकी १८१ वाहनांवर नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई केली असून, ०७ वाहने जप्त केले आहेत. यामधून १८ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मागील वर्षाचा तपशील
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या एका वर्षात १५१२ स्कूल बस व १५३० विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी अवैध वाहने तपासण्यात आली. त्यापैकी ४५६ स्कूल बस व ४८८ अवैध वाहने दोषी ठरली. या कालावधीत एकूण ३ हजार ४२ स्कूल बस तपासल्या गेल्या असून, त्यापैकी ९४४ वाहने दोषी आढळली. यामधून ७५ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली
कालावधी | स्कूल बस | अवैध वाहने | स्कूल बस | अवैध वाहने | अटकावून ठेवलेले वाहने | दंड वसूल |
---|---|---|---|---|---|---|
एप्रिल | १३५ | ११८ | ४५ | ३८ | ७ | ८ लाख ३० हजार |
में | ० | २५ | ० | १ | ० | १० हजार |
जुन | १२६ | ६९ | ४१ | ११ | ० | ५ लाख २० हजार |
जुलै | ८९ | ७१ | २३ | २२ | ० | ४ लाख ७९ हजार |
एकुण = | ३५० | २८३ | १०९ | ७२ | ७ | १८ लाख ३९ हजार |
०१ ऑगस्टनंतर ज्या शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत, अशा वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले जाणार नाही. तसेच, अशी वाहने रस्त्यावर विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– अर्चना गायकवाड, (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे)