भाटघर धरणाचे पाणी झाले हिरवे (फोटो- टीम नवराष्ट्र)
भोर: भोर तालुक्यातील भाटघर(येसाजी कंक जलाशय) धरणाच्या परिसरातील पाण्याला अचानक हिरवा रंग चढल्यामुळे तसेच बॅक वॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी व नऱ्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हा बदल स्पष्टपणे दिसून येत असल्याने स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन संबंधित प्रकारामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या परिणामकारकतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
तुमच्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती काय?
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने कोकण, उत्तर कोकण आणि घाटमाथ्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आणि जोरदार वादळासह वादळ येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, मराठवाडा, विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात काही अंशी पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र असले तरी कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, मराठवाडा आणि विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.