कर्जत/ संतोष पेरणे: माथेरान या वन जमिनीवर वसलेल्या शहरात जंगल अधिकार प्रमाणात आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी बनवलेल्या कायदे यांच्यात वन्य प्राणी आणि झाडे यांना महत्व देण्यात आले आहे. माथेरानचे जंगलात असलेल्या वन्य प्राणी यांना जंगलात मुक्त संचार करता यावा यासाठी कुठेही दगडी कुंपण घालण्यास बंद आहे,मात्र सेट व्हिला या बंगल्याला तब्बल आठ फूट उंचीचे दगडी कुंपण घालण्यात आले असल्याने पालिका प्रशासन आणि वन विभाग यावर करावी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
माथेरान हे ब्रिटिशांनी वसवलेले पर्यटन स्थळ असून येथे थंडगार हवेचा आस्वाद घेण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. त्यात माथेरान हे तेथील घनदाट जंगल आणि वनसंपदा यामुळे प्रसिद्ध असून त्या जंगलात मोठ्या प्रमाणात प्राणी आणि पक्षी आहेत. त्यामुळे या ठिकाणचे जंगलात असलेल्या प्राण्यांनी मुक्त संचार करावा यासाठी ब्रिटिशांनी कायदे करून ठेवले आहेत. त्यात माथेरान प्लॉट आणि बाजार प्लॉट अशी भूखंडाची रचना केली असली तरी कोणत्याही लीज धारक जागा मालकाने आपल्या जागेला अकुंपण करू नये असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यात माथेरान मधील जमीन हि लीज वर वापरण्यास दिलेली असल्याने या जमिनीचे मूळ मालक हे सरकार शासन असल्याने माथेरान मध्ये वन्य प्राण्यांना मुक्त संचार करण्यासाठी कोणत्याही जागेला डागाडी कुंपण करू नये असे निर्देश आहेत.
जेमतेम दोन फूट उंचीचे आणि ते देखील स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या दगडांचे कुंपण घालण्याच्या मुभा आहेत. मात्र आता माथेरान मध्ये सर्रास जांभा दगड आयात करून आणला जातो आणि त्या दगडाचे माध्यमातून बंगले धारक दगडी कुंपण सिमेंट बांधकाम करून करीत असल्याचे आढळून येत आहे. डम्पिंग ग्राउंड मंकी पॉईंट रस्त्यावर सेट व्हील बांगला असून या बंगल्याच्या मालकाने त्या ठिकाणी चक्क आठ फूट उंचीचे जांभा दगडाचे सिमेंट बांधकाम करून भिंत बांधली आहे. त्या भिंतीच्या आत काय आहे हे देखील बाहेरच्या व्यक्तीला दिसून येत नाही.असे असताना त्याबाबत माथेरान पालिका तसेच माथेरान वन विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.सध्या हाच सेट व्हिला बंगला अन्य नावाने ओळखला जात असून अशा भिंतीवर वर शासन स्तरावरून कारवाई होणार आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.