दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू
70 घरांची वस्ती असलेल्या गेल्या दीड दोन महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित होता.सतत सुरू असणारा पाऊस आणि नेहमी कमी जास्त होणारा विद्युत पुरवठा तसेच लाईटचा लपंडाव यामुळे शिंगढोळ गावातील विद्युत रोहित्र खराब झाला.त्याचा परिणाम शिंगढोळ गावातील पूर्ण गाव अंधारात ही बाब गावातील जागरूक स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, तथा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कर्जत तालुका सचिव रामदास घरत यांनी स्थानिक रहिवाशी यांना सोबत घेऊन धावपळ सुरू केली.त्यानंतर रामदास घरत यांनी तात्काळ महावितरण वरीष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि लागलीच दुसऱ्या दिवशी तात्काळ पनवेल येथे जाऊन दुसरा विद्युत रोहित्र आणले. शिंगढोळ गावात महावितरणचे वायरमन दिलीप लोभी यांनी कर्जत येथून शिंगढोळ येथे पोहचले.
त्यावेळी ग्रामस्थ योगेश घरत,समाधान कडू, भगवान घरत, दिलीप कडू,हणमंत घरत, प्रणित घरत,जगदीश फाळे, पराग घरत, कांतीलाल घरत,प्रमोद घरत,स्वप्निल घरत आणि अनेक ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. त्यामुळे ताबडतोब शिंगढोळ गावचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.महावितरण कंपनी चे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी तत्काळ नवीन वीज रोहित्र यांनी कार्यवाही केल्याने त्यांचे देखील आभार मानले जात आहेत.अगदी दुसऱ्याचं दिवशी वीज पुन्हा आल्याने ग्रामस्थांनी आपल्या गावातील कार्यकर्त्यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.
तर दुसरीकडे शॉर्टसर्किट झाल्याने अनेकांना पावसात धोका होवू शकतो. त्यामुळे खबरदारी व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वीज खंडित केली जाते. काही ठीकाणी तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची दूरुस्ती होईपर्यंत वीज पुरवठा खंडित ठेवावा लागतो. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत ग्राहकांना त्रास होतो.






